शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नवीन खरीप हंगामासाठी जि.प.चे नियोजन काय?

By admin | Updated: May 19, 2017 00:19 IST

जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ असलेल्या जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकारी विराजमान होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला.

अडीच महिन्यांपासून बैठक नाही : पदाधिकारी कक्ष दुरूस्तीत व्यस्त लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ असलेल्या जिल्हा परिषदेत नवीन पदाधिकारी विराजमान होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला. मात्र अद्याप नवीन पदाधिकाऱ्यांनी कामाला सुरूवात केलेली नाही. अडीच महिन्यांपासून सर्वसाधारण सभाही झालेली नाही. विशेष म्हणजे नवीन खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेने कोणतेही नियोजन केलेले नाही. जिल्हा परिषदेत सध्या अनेक कामे ठप्प पडली आहेत. नवीन पदाधिकारी आपापल्या कक्षाचे नविनीकरण केल्याशिवाय कक्षात बसायला तयार नाहीत. यामुळे अधिकाऱ्यांचा मनमर्जी कारभार सुरू आहे. काही दिवसातच शेतकऱ्यांना बियाण्यांची गरज पडणार आहे. वेळेवर बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांना धावपळ करावी लागते. बेभाव बियाणे घ्यावे लागतात. त्यात फसगतही होते. पण जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने त्यादृष्टीने कोणतेही नियोजन केले नाही, असा आरोप वसा-पार्ला जि.प.क्षेत्राचे सदस्य आणि माजी कृषी सभापती जगन्नाथ पाटील बोरकुटे यांनी केला आहे. पशुसंवर्धन विभागाचे गावागावत जाणारे फिरते वैद्यकीय पथक बंद झाले. पाऊस आल्यानंतर गुरांचे आजारही वाढतात. त्यामुळे त्यांना रोगप्रतिबंधक लस देणे गरजेचे आहे. मात्र त्याचे नियोजन नाही. अनेक लघु पाटबंधारे विभागाच्या तलावांचे व बंधाऱ्यांचे काम अर्धवट आहे. तलाव खोलीकरणासाठी देण्यात येणारा १५ ते २० लाखांचा निधी अपुरा आहे. त्यातून पुरेसे खोलीकरण होत नसल्याने पाण्याचा प्रत्यक्ष संग्रह होत नाही. हा निधी वाढवून द्यावा अशी मागणी बोरकुटे यांनी केली आहे. मुरूमासाठी अनेक नैसर्गिक पहाड खोदून काढले जातात. त्याऐवजी तलावांमधील मुरूमाची फुकट रॉयल्टी दिली असती तर तलाव खोलीकरणाचा खर्च वाचला असता आणि पहाडही वाचविता आले असते असे बोरकुटे लोकमतशी बोलताना म्हणाले.