शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

बँकांमधील गर्दीचे करायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST

बँक ऑफ इंडियाने मुख्य प्रवेशद्वारासमोर ग्राहकांना बसण्यासाठी विशिष्ट अंतर ठेवत खुर्च्या ठेवल्या आहेत. तेथून क्रमवारीनुसार ३-३ जणांना आतमध्ये सोडले ...

बँक ऑफ इंडियाने मुख्य प्रवेशद्वारासमोर ग्राहकांना बसण्यासाठी विशिष्ट अंतर ठेवत खुर्च्या ठेवल्या आहेत. तेथून क्रमवारीनुसार ३-३ जणांना आतमध्ये सोडले जाते. मास्क लावल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. सॅनिटायझर, मास्क याचा तर कटाक्षाने वापर केला जातो. हीच स्थिती स्टेट बँक ऑफ इंडिया येथेही आहे. या बँकेत तर एकावेळी एकाच ग्राहकाला आत सोडले जाते. विशेष म्हणजे ग्राहकांनी दारावर गर्दी करू नये म्हणून प्रत्येकाला नंबरच्या चिठ्ठ्या दिल्या जातात; पण तरीही दारासमोर उभे राहून ग्राहक आत जाण्याची प्रतीक्षा करताना दिसतात.

बँक ऑफ इंडिया

---

अधिकारी होतात हतबल

आतमध्ये गेलेला ग्राहक कुठे फिरेल आणि किती वेळ लावेल याचा नेम नसतो. बँकेची वेळ संपत आली त्यावेळी बाहेर असलेल्या सर्वांना आतमध्ये घेतले जाते. त्यावेळी गर्दी होते. अशावेळी बँकेचे अधिकारी-कर्मचारी त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही.

----

बँकेत कमीत कमी लोकांनी यावे यासाठीच बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा घालून दिली आहे. केवळ पैसे किंवा चेक जमा करणे आणि काढणे हेच व्यवहार सुरू आहेत. बाहेर थांबणाऱ्या ग्राहकांसाठीही जागेची मर्यादा असल्याने चार लोकांना एकावेळी आत सोडले जाते.

- अनुपम रवि

व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया

----

सर्वाधिक ग्राहक, शिस्तीचे पालन

- बँकेत प्रवेश करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाला नंबरची कागदी चिठ्ठी दिली जाते. वॉचमन त्यावरील नंबर पुकारतो. त्यानुसार ग्राहक आतमध्ये जाऊन आपले व्यवहार करतो. त्यामुळे गर्दीवर बरेच नियंत्रण आले आहे.

----

आता बँकेची वेळ सकाळी १० ते २ पर्यंतच केली आहे. पेन्शनसाठी येणाऱ्या वृद्ध ग्राहकांची सध्या गर्दी आहे. त्यांना प्राधान्याने आत सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय मनुष्यबळ कमी असताना अतिरिक्त काउण्टरही लावले आहेत.

- श्यामराव ईसनसुरे

व्यवस्थापक, स्टेट बँक ऑफ इंडिया

-

ग्राहकांना करावी लागते एक ते दीड तास प्रतीक्षा

मी पैसे काढण्यासाठी बँकेत आले आहे. एक तासापेक्षा जास्त वेळ गेटबाहेर वाट पाहावी लागली. एटीएम नाही म्हणून प्रत्यक्ष बँकेत येऊन पैसे काढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

- ज्योत्स्ना मामीडवार, ग्राहक

मी किराणा एजन्सीचे पैसे टाकण्यासाठी आलो आहे. दीड तासापासून रांगेत आहे. खूप परेशानी आहे. २ वाजेपर्यंतच वेळ असल्यामुळे लोकांची गर्दी जास्त वाढत आहे.

- गुरुदेव कुनघाडकर, ग्राहक

- लॉकडाऊनमुळे आर्थिक व्यवहार कमी होत आहेत; पण तरीही अनेक जणांना बँकेतून पैसे काढल्याशिवाय भागत नाही. विशेषत: पेन्शनधारकांना बँकेत यावेच लागते. वेळ मर्यादित असल्याने जास्त त्रास होतो.

- राजेंद्र चौधरी, ग्राहक