शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
3
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
4
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
5
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
6
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
8
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
9
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
10
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
11
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
12
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
13
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
14
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
15
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
16
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
17
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
18
आम्ही तुमची अर्थव्यवस्था चिरडून टाकू; रशियन तेल खरेदीमुळे अमेरिकेचा भारताला इशारा
19
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
20
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’

कुटुंबांचे कल्याण साधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:36 IST

आधुनिक युगात विविध साधनांच्या माध्यमातून मानवाची प्रगती होत आहे.

ठळक मुद्देकेंद्राचे उद्घाटन : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आधुनिक युगात विविध साधनांच्या माध्यमातून मानवाची प्रगती होत आहे. मात्र वैचारिक मतभेद असल्याने बºयाचदा कुटुंबाची वाताहत होते. परिणामी समाजावरही परिणाम होतात. कौटुंबिक वातावरण सलोख्याचे व स्नेहाचे कायम ठेवून कुटुंबाचा कल्याण साधण्याचे कार्य झाले पाहिजे, हे कौटुंबिक कल्याण समितीचे महत्त्वाचे काम आहे, असे प्रतिपादन गडचिरोलीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या वतीने नुकतेच कौटुंबिक कल्याण समिती केंद्राचे उद्घाटन न्याय सेवा सदन गडचिरोली येथे करण्यात आले. शिवाय यावेळी कौटुंबिक कल्याण समितीची स्थापना करून प्रशिक्षणही घेण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा न्यायाधीश यू. एम. पदवाड, न्या. एस. टी. सूर, मुख्य न्यायदंडाधिकारी बी. एम. पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून दिवाणी न्यायाधीश (क-स्तर) एन. सी. बोरफलकर, दुसरे दिवाणी न्यायाधीश एन. पी. वासाळे, के. आर. सिंघेल, कौटुंबिक कल्याण समितीच्या सदस्य वैशाली पदवाड, वैशाली सूर, सुरेखा बारसागडे आदी उपस्थित होते.याप्रसंगी प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय मेहरे यांनी कौटुंबिक कल्याण समितीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. जिल्हा न्यायाधीश यू. एम. पदवाड यांनी ४९८ अ मध्ये पोलिसांची भूमिका काय असली पाहिजे, याबाबत सविस्तरपणे मौलिक मार्गदर्शन केले. एस. टी. सूर यांनी कौटुंबिक समितीमध्ये पदाधिकाºयांची भूमिका कोणती असेल, याबाबतची माहिती दिली. मुख्य न्याय दंडाधिकारी बी. एम. पाटील यांनी कौटुंबिक कल्याण समितीच्या स्थापनेचा हेतू विशद केला. संचालन न्या. ता. के. जगदाडे यांनी केले तर आभार कनिष्ठ लिपीक बी. व्ही. वाळके यांनी मानले. कर्मचाºयांनी सहकार्य केले.