शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांचा खात्मा करणाऱ्या सी-६० पथकाचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 22:49 IST

ज्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर १२ दिवसांपूर्वी धीरगंभीर वातावरणात पोलिसांच्या सी-६० पथकातील शहीद हवालदाराला अखेरचा निरोप देण्यात आला, त्याच पोलीस मैदानावर गुरूवारी सायंकाळी सी-६० पथकाचा विजयी जल्लोष सुरू होता.

ठळक मुद्देमुख्यालयात आतषबाजी : बँडच्या तालावर जवानांसह अधिकाऱ्यांनीही धरला ताल

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : ज्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर १२ दिवसांपूर्वी धीरगंभीर वातावरणात पोलिसांच्या सी-६० पथकातील शहीद हवालदाराला अखेरचा निरोप देण्यात आला, त्याच पोलीस मैदानावर गुरूवारी सायंकाळी सी-६० पथकाचा विजयी जल्लोष सुरू होता. दिड आठवड्यापूर्वी आपल्यातीलच एका जवानाला हिरावून घेण्याचा जणू बदलाच घेतल्याचे समाधानी भाव पोलीस जवानांच्या आणि अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर होते.नक्षलविरोधी अभियानात बुधवारी (दि.६) झिंगानूर उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात नक्षल्यांचे शिबिर उद्ध्वस्त करून सात नक्षल्यांना कंठस्रान घालण्यात यश आले. एवढ्या संख्येने एकाचवेळी नक्षलवादी ठार होण्याची घटना पहिलीच असल्यामुळे साहजिक हे अभियान राबविणाºया सर्व पोलीस अधिकाऱ्यांसह जवानांचा हुरूप वाढला. नक्षल्यांवर वरचढ होऊन मोहीम फत्ते करणाऱ्या सी-६० पथकाचे नेतृत्व करणारे सहायक पोलीस उपनिरीक्षक मोतीराम मडावी व त्यांच्या संपूर्ण पथकाला गुरूवारी पोलीस मुख्यालयात बोलविण्यात आले.सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास हे पथक पोहोचताच त्यांच्या स्वागतासाठी उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अ.पो.अधीक्षक महेंद्र पंडीत आदी प्रमुख अधिकाºयांसह मुख्यालयातील संपूर्ण पोलीस कर्मचारी जमले होते. महिला पोलीस आणि कुटुंबियांनी त्यांचे औक्षवण करून, फूल देऊन स्वागत केले. या पथकाच्या जयघोषणही करण्यात आला. अधिकाºयांनी त्यांना मिठाई भरविली. यावेळी आतिषकबाजी सोबतच बँडच्या तालावर कर्मचाºयांनी ताल धरला. त्यांचा उत्साह आणि आनंद पाहून अधिकाऱ्यांचेही पाय थिरकले.