शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तीनच कर्मचाऱ्यांवर शहरातील विद्युत व्यवस्थेचा भार

By admin | Updated: November 18, 2014 22:54 IST

शहरातील विद्युत व्यवस्थेचा भार केवळ तीन कर्मचारी सांभाळत असून यातही दोन कर्मचारी रोजंदारी असून एक कर्मचारी नियमित आहे. मात्र त्यांच्याकडे सुद्धा विद्युत विभागाचा प्रभार सोपविण्यात आला आहे.

गडचिरोली : शहरातील विद्युत व्यवस्थेचा भार केवळ तीन कर्मचारी सांभाळत असून यातही दोन कर्मचारी रोजंदारी असून एक कर्मचारी नियमित आहे. मात्र त्यांच्याकडे सुद्धा विद्युत विभागाचा प्रभार सोपविण्यात आला आहे. शहरातील अनेक पथदिवे बंद असतांनाही कार्यालयामध्ये मात्र याबाबतची कोणतीही नोंद नाही.गडचिरोली शहर दिवसेंदिवस विस्तारत चालला आहे. त्यानुसार नगर पालिका प्रशासन पथदिव्यांचा सुद्धा विस्तार करीत आहे. शहरात एकूण ३ हजार विद्युत खांब असून त्यांना जवळपास ३ हजार ५०० पथदिवे लावण्यात आले आहेत. यापूर्वी नगर परिषदेमध्ये पथदिव्यांची देखभाल करण्यासाठी सहा कर्मचारी कार्यरत होते. यातील तीन कर्मचारी नियमित तर तीन कर्मचारी रोजंदारी तत्वावर नियुक्त करण्यात आले होते. नियमित असलेले कर्मचारी विद्युतचे तज्ज्ञ होते. मात्र या तिनही कर्मचाऱ्यांची तीन महिन्यांपूर्वी दुसऱ्या कार्यालयात बदली करण्यात आली. त्यामुळे या विभागाचा प्रभार नाईलाजास्तव मिळकत व्यवस्थापकाकडे सोपविण्यात आला. मात्र त्यांना विद्युत विभागाचा फारसा अनुभव नसल्याने विद्युत दिव्यांची देखभाल करतेवेळी फार मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यांच्या दिमतीला दोन रोजंदारी कर्मचारी देण्यात आले आहेत. मात्र शहराचा व्याप व पथदिव्यांची संख्या लक्षात घेतली तर हा सर्व डोलारा या तीन कर्मचाऱ्यांना सांभाळतेवेळी बरीच कसरत करावी लागत आहे. शहरातील ३ हजार ५०० विद्युत दिव्यांपैकी ५०० पेक्षा अधिक दिवे बंद स्थितीत आहेत. मात्र याबाबतची कोणतीही नोंद नगर परिषदेच्या विद्युत विभागाकडे उपलब्ध नाही. याबाबत येथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, रात्रीच्या सुमारास शहरात फिरून किती पथदिवे बंद आहेत, हे बघितले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या खांबाला दिवसा बल्ब लावल्या जातो, अशी माहिती दिली. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरमोरी मार्गावरील वनविभागाच्या नाक्यापासून ते कठाणी नदीपर्यंतचे संपूर्ण विद्युत दिवे मागील सहा महिन्यांपासून बंद पडले आहेत. मात्र सदर पथदिवे अजूनही दुरूस्त करण्यात आली नाही. त्याचबरोबर शहराच्या प्रत्येक वॉर्डातील अनेक दिवे बंद आहेत. याकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.मुल मार्गावरील बहुतांश पथदिवे झाडांनी झाकली आहेत. त्यामुळे या दिव्यांचा प्रकाशच पडत नाही. वॉर्डातील बंद दिव्यांबाबत नागरिक या ठिकाणी तक्रार घेऊन येतात. मात्र सदर तक्रारीचे निराकरण वेळेवर होत नसल्याने नागरिकसुद्धा त्रस्त झाले आहेत. (नगर प्रतिनिधी)