शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आठवडी बाजारातील उलाढाल मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2016 01:56 IST

८ नोव्हेंबर मंगळवारच्या मध्यरात्रीपासून केंद्र सरकारने ५०० व १००० च्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्या.

भाजीपाला विक्रीत घट : ५०० व १००० च्या नोटा चलनातून बंद झाल्याचा परिणामगडचिरोली : ८ नोव्हेंबर मंगळवारच्या मध्यरात्रीपासून केंद्र सरकारने ५०० व १००० च्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्या. यामुळे १०० च्या नोटा व सुट्या पैशांचा प्रचंड तुटवडा जिल्हाभरात निर्माण झाला आहे. नव्या नोटा काढण्यासाठी तसेच ५०० व १००० च्या जुन्या नोटा बँकेत भरण्यासाठी ग्राहकांची बँकेसमोर गर्दी होत आहे. ५०० व १००० च्या नोटा बंद केल्यामुळे गडचिरोली येथील रविवारच्या आठवडी बाजारातील आर्थिक उलाढाल मंदावली असल्याचे दिसून आले. अनेक विक्रेत्यांनी नेहमीपेक्षा आज ५० टक्केच व्यवसाय केल्याचे विक्रेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले आहे.गडचिरोलीच्या आठवडी बाजारात अनेक ग्राहक ५०० व १००० च्या जुन्या नोटा घेऊन भाजीपाला व इतर वस्तू खरेदीसाठी आले होते. त्यांनी सदर नोटा खपवून साहित्य खरेदी करण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील विक्रेत्यांनी सदर ५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधित ग्राहकांनी त्यांच्याजवळ असलेल्या १०० ते १५० रूपयांतच मिळेल तेवढा भाजीपाला खरेदी केला. प्रत्येक आठवडी बाजारात अडीचशे रूपयांचा भाजीपाला घेणाऱ्या अनेक ग्राहकांनी आज १०० रूपयांतच भाजीपाल्याची खरेदी आटोपली तसेच काही मोजके ग्राहक अनेक दुकानावरून भाजीपाला खरेदी न करता परतले. दुकानदारांशी सदर प्रतिनिधीने संवाद साधल्यानंतर ग्राहकाकडून ५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारणे बंद केल्याची माहिती त्यांनी दिली. १०० रूपयाच्या नोटांच्या तुटवड्यामुळे सदर आठवडी बाजारात भाजीपाला व इतर साहित्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्याही कमी दिसून आली. एकूणच नोटा बंदच्या निर्णयाने आठवडी बाजारातील आर्थिक उलाढाल मंदावल्याचे दिसून आले. (स्थानिक प्रतिनिधी)केंद्र सरकारने ५०० व १००० च्या नोटा चलनातून बंद केल्यामुळे नागपूरच्या ठोक व्यापाऱ्यांनी किरकोळ व्यापाऱ्यांकडून सदर नोटा स्वीकारणे बंद केले आहे. उधारीवर माल न्या, मात्र ५०० व १००० च्या जुन्या नोटा देऊ नका, असे ठोक व्यापारी किरकोळ व्यापाऱ्याला सांगत आहेत. सदर नोटा बंद केल्याने भाजीपाला विक्रीत घट आली आहे.- देविदास लांजेवार, भाजीपाला विक्रेते, ब्रह्मपुरी५०० व १००० च्या जुन्या नोटा घेऊन आलेल्या ग्राहकांना आपण भाजीपाल्याची विक्री केली नाही. सदर नोटा ठोक व्यापारी घेत नसल्याने या नोटा स्वीकारून बँकेत रांगेमध्ये लागणे परवडेजोगे नाही. बाजार व इतर कामे सोडून बँकेत जाण्यासाठी सवडही नाही. त्यामुळे आपण जुन्या नोटा स्वीकारणे बंद केले आहे. त्यामुळे ग्राहकांकडून खरेदी कमी झाली.- दामदेव मेश्राम, भाजीपाला विक्रेते, गांगलवाडीकेंद्र सरकारने ५०० व १००० च्या जुन्या नोटा चलनातून बंद केल्याने आठवडाभरापासून अनेक ठिकाणच्या आठवडी बाजारात साहित्य विक्री कमी झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून आपण कापड विक्रीत अर्धाच व्यवसाय केला आहे. १०० व ५० च्या नोटांचा तुटवडा असल्याने अनेक ग्राहक खरेदी विना परत गेले.- विजय गुलदेवकर, रेडिमेड कापड विक्रेते, गडचिरोली