शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ मुलीचा लावला विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 01:10 IST

जगात ज्याला कुणी नाही त्याच्या पाठिशी देव आहे, असे म्हणतात. याचाच प्रत्यय सोमवारी घोट येथे आला. लोकमंगल या सामाजिक संस्थेने अनाथ मुलीचा विवाह लावून दिला.

ठळक मुद्देलोकमंगल संस्थेचा पुढाकार : बालपणीच हरवले होते मातृपितृ छत्र

ऑनलाईन लोकमतघोट : जगात ज्याला कुणी नाही त्याच्या पाठिशी देव आहे, असे म्हणतात. याचाच प्रत्यय सोमवारी घोट येथे आला. लोकमंगल या सामाजिक संस्थेने अनाथ मुलीचा विवाह लावून दिला.सलोनी लक्ष्मण मडावी रा. बल्हारपूर जि. चंद्रपूर व दीपक जीवनदास निशाने रा. मुरखळा ता. चामोर्शी असे विवाहबद्ध झालेल्या जोडप्याची नावे आहेत. सलोनी मडावी ही २०११ पासून मातोश्री निराश्रीत महिला अल्प मुदती निवासगृह घोट येथे आश्रयाला होती. सलोनी लहान असतानाच तिची आई दुसºयासोबत पळून गेली व लग्न केले. सलोनीच्या वडिलांनीही दुसरा विवाह केला. त्यामुळे सावत्र आईने तिला घराबाहेर काढून दिले. शेवटी सलोनी मावशीच्या आश्रयाला आली. परंतु नंतर मावशीनेही लग्न केल्याने ती अनाथ झाली. ना घर ना नातेवाईक, अगदी कोवळ्या वयात ती इतरत्र भटकत होती. मिळेल तिथे खात होती. अशीच रस्त्याने भटकत असताना बल्हारपूर पोलिसांना ती आढळली. पोलिसांनी तिला या संस्थेत आणून दिले. ती लहान असल्याने मनातील दु:ख तिला सांगता येत नव्हते. अशा अवस्थेत लोकमंगल संस्थेने तिला आश्रय दिला. मायेची ममता दिली. सुशिक्षित केले. आयुष्यात आईवडिलाची तिला उणीव भासू दिले नाही. उद्ध्वस्त झालेले जीवन सुधारले आहे. १९ फेब्रुवारीला धार्मिक रितीरिवाज व परंपरेनुसार तिचा विवाह सोहळा पार पाडला.याप्रसंगी तंमुस अध्यक्ष रमेश दुधबावरे, उपसरपंच साईनाथ नेवारी, कर्दुळचे पोलीस पाटील हरिदास चलाख, रमेश श्रुंगारपवार, गिरजाशंकर उपाध्ये, डॉ. महेंद्र श्रुंगारपवार यांच्यासह संस्थेचे प्रमुख सिस्टर शाईनी, सजीवा, निर्मला, सबीना, कार्यकर्ते मनोहर मेश्राम, वातूजी नेवारे उपस्थित होते.