लाेकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी विधिमंडळाचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची गुरुवारी मुंबईच्या कार्यालयात भेट घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील विकासात्मक कामांचे निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली व जिल्ह्यातील समस्यांचे अवलोकन करून दिले. यावर मागास गडचिराेली जिल्ह्यातील विकास कामे व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही ना. झिरवळ यांनी दिली. जिल्ह्यातील रेंगाळत असलेली कामे मार्गी लावण्यासंदर्भात व अन्य नावीन्यपूर्ण विकासात्मक कामांसाठी निधीची तरतूद करण्यासंदर्भात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे विषय लावून धरला.
महाराष्ट्रात गडचिरोली जिल्हा व मुख्यतः अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्र शेवटच्या टोकावर असल्याने या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी स्वतः प्रयत्नशील असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी आ. धर्मरावबाबा आत्राम यांना सांगितले.