शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

योजनेतून वडसाचा विकास करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 22:58 IST

राज्यातील विकसनशील नगर परिषद म्हणून देसाईगंज पालिकेची ओळख आहे. देसाईगंज शहराच्या सर्वागिण विकासासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून विविध योजना राबवून शहराचा विकास घडवून आणणार, अशी ग्वाही गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही : देसाईगंजात ग्रीन जिम व सिटी सर्वे कामाचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : राज्यातील विकसनशील नगर परिषद म्हणून देसाईगंज पालिकेची ओळख आहे. देसाईगंज शहराच्या सर्वागिण विकासासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असून विविध योजना राबवून शहराचा विकास घडवून आणणार, अशी ग्वाही गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.स्थानिक नगर पालिकेच्या वतीने ग्रीन जिम व देसाईगंज शहरातील सिटी सर्वे कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. कृष्णा गजबे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष शालू दंडवते, मुख्याधिकारी तैमुर मुलानी, भूमिलेख अधीक्षक डाबेराव, उपविभागीय अधिकारी मेश्राम, तहसीलदार सोनवाने यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.पुढे बोलताना जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, प्रशासकीय व शासकीय स्तरावर महाराष्टÑ राज्य प्रगतशील बनण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. देसाईगंज नगर परिषद अनेक वर्षांपासून विविध विकसनशील योजन राबवित असून गौरवप्राप्त पालिका म्हणून या पालिकेचा महाराष्टÑात नावलौकिक आहे. शहरातील नागरिकांना मालमत्तेची कागदोपत्री मालकी प्राप्त व्हावी यासाठी सिटी सर्वेचा शुभारंभ करण्यात आला.आ. कृष्णा गजबे म्हणाले, ग्रामीण भागात मनरेगा, रोहयो तसेच कृषी क्षेत्रात विविध योजना शासनातर्फे राबविले जातात. सदर योजना देसाईगंज नगर पालिका क्षेत्रात राबविण्यात याव्या, यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाला न. प. चे सभापती, नगरसेवक व नागरिक हजर होते.दिव्यांगांना धनादेशाचे वितरणेसाईगंज नगर परिषदेच्या वतीने पालिका क्षेत्रातील दिव्यांगांना तीन टक्के राखीव निधीतून धनादेशाचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. याचा लाभ शहरातील अनेक दिव्यांगांनी घेतला. दिव्यांगांसाठी शासनाने अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन दिव्यांगांनी आपला विकास साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह व आ. कृष्णा गजबे यांनी आपल्या भाषणातून केले.