शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

पाणीपुरवठा आॅक्सीजनवर

By admin | Updated: July 15, 2014 00:00 IST

येथील ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर या कार्यालयात सोयीसुविधांचा अभाव असल्याने याचा फटका या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसत आहे.

रिक्त पदे : अहेरी ग्रामीण पाणीपुरवठा विभागअहेरी : येथील ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालयातील अनेक पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर या कार्यालयात सोयीसुविधांचा अभाव असल्याने याचा फटका या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसत आहे. अहेरी परिसरातील पाणीपुरवठा योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अहेरी येथे उपविभागीय पाणीपुरवठा कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र कार्यालयातील अनेक पदे रिक्त असल्याने दुसऱ्या पाणीपुरवठा योजनांवर नियंत्रण ठेवण्याचे सोडाच या कार्यालयाचे स्वत:वरच नियंत्रण राहिलेले नाही. उपविभागीय अधिकारी म्हणून पी. आर. मडावी हे कार्यरत आहेत. मात्र ते कार्यालयात नेमके कधी येतात व कधी जातात, याचा पत्ताच या कार्यालयात कामासाठी आलेल्या नागरिकांना लागत नाही. एखाद्या नागरिकाने मडावी यांच्याबद्दल चौकशी केल्यास ते दौऱ्यावर आहेत किंवा बैठकीसाठी गडचिरोली, नागपूर येथे गेले आहेत, असे उत्तर येथील कर्मचाऱ्यांकडून देण्यात येते. त्यामुळे आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागते. महत्वाचे म्हणजे ते अहेरी येथे मुख्यालयी न राहता चंद्रपूर येथून ये-जा करतात. जिल्हा परिषदेमध्ये १२ वर्षापूर्वी पाणीपुरवठा विभाग सुरू झाला. तेव्हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे वर्ग ३ व ४ चे कर्मचारी काही कर्मचारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला मिळाले.सध्य:स्थितीत या कार्यालयात कनिष्ठ अभियंत्याची ६ पदे रिक्त आहेत. ४ कनिष्ठ अभियंते कार्यरत आहेत. यापैकी २ पदे नियमित असून २ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. कनिष्ठ लिपिकाचे ३ पदे मंजूर आहेत, तिनही पदे रिक्त आहेत. परिचराच्या २ पदांपैकी १ पद रिक्त आहे. रिक्त पदांमुळे कामाचा खोळंबा होत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने काही कर्मचारी परत घेतल्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली आहे.लिपिकाचे पदे रिक्त असल्याने कनिष्ठ अभियंता जे. जी. भलावी यांना लिपिकाचे काम करावे लागत आहे. संगणकाची सुविधा उपलब्ध नाही. कनिष्ठ अभियंता स्वत:च्या लॅपटॉपवरून अतिमहत्वाची कामे व पत्र व्यवहार करीत आहेत. कार्यालयात असलेल्या वॉलमॅन यांना लिपिकाचे काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे. दरवर्षीच नवनवीन पाणीपुरवठा योजना बांधल्या जातात. त्यामुळे या विभागाच्या जबाबदारीत दरवर्षी भर पडत आहे. मात्र येथील कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने पाणीपुरवठा योजनेच्या कर्मचाऱ्यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शन वेळेवर मिळत नाही. परिणामी अहेरी उपविभागातील अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. या गंभीर बाबीकडे वरिष्ठांनी वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)