शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पाणी पुरवठा विभागाची वाहने भंगारात

By admin | Updated: July 22, 2015 02:20 IST

येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची दोन्ही वाहने नादुरूस्त असून ती भंगार अवस्थेत पडून आहेत.

दुरूस्तीला निधीच नाही : प्रभारी अधिकाऱ्यावरच कार्यालयाचा डोलाराविवेक बेझलवार अहेरीयेथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची दोन्ही वाहने नादुरूस्त असून ती भंगार अवस्थेत पडून आहेत. परिणामी ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांची देखभाल व दुरूस्ती करण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे. अहेरी ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाच्या हद्दीत आलापल्ली, नागेपल्ली, भूजंगरावपेठा, वांगेपल्ली, चिंचगुडी, किष्टापूर, गडअहेरी आदी पाणी पुरवठा योजना येतात. या योजनांची देखभाल करण्यासाठी अहेरी येथे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची स्थापना करण्यात आली आहे. या विभागाला शासनाकडून दोन वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती. ही वाहने काही काळ व्यवस्थित सुरू होती. मात्र मागील दोन ते तीन वर्षांपासून ही दोन्ही वाहने बंद पडली असून ती भंगार अवस्थेत कार्यालयाच्या आवारात पडून आहेत. वाहनचालकाचे पद रिक्त असल्याने या वाहनांकडे कोणीच लक्ष देण्यास तयार नाही. एखाद्या वेळेस दौरा करण्याची पाळी आल्यास किरायाणे वाहन घ्यावे लागते. वाहनांमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या कार्यालयाला वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. या कार्यालयात उपविभागीय अभियंत्याचे एक पद रिक्त आहे. वरिष्ठ सहायकाचेही पद मंजूर असून ते सुध्दा रिक्त आहे. कनिष्ठ सहायक, वाहनचालक, परिचर यांचेसुध्दा प्रत्येकी एक पद रिक्त आहे. एकूण १४ पदांपैकी केवळ सात पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित सात पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत असलेले बारापात्रे यांच्याकडे सुध्दा अतिरिक्त प्रभार देण्यात आला असल्याने ते सुध्दा कार्यालयाला जास्त वेळ देऊ शकत नाही. अनेक पदे रिक्त असल्याने नागरिकांची कामे वेळेवर होण्यास अडचण निर्माण होत आहे. या कार्यालयांमध्ये वॉल्वमन म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचे एप्रिलपासून वेतन झाले नाही. याबाबत अधिकची माहिती जाणून घेतली असता, संबंधित हेडवर निधीच उपलब्ध नसल्याने वेतन झाले नसल्याची माहिती दिली. अधिकारी बदलले, फलकात जुन्यांचा नामोल्लेख कायमया कार्यालयात केंद्रीय माहिती अधिकारचे फलक लावण्यात आले आहे. त्यावर सहायक माहिती अधिकारी म्हणून एच. एस. मानके तर माहिती अधिकारी म्हणून टी. आर. मडावी यांचे नाव नमूद करण्यात आले आहे. मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांची कार्यालयातून दोन वर्षांपूर्वी बदली झाली आहे. दोन वर्ष उलटूनही बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे बदलविण्यात आले नाही. यावरून या कार्यालयातील दस्तावेज किती अपडेट ठेवली जातात, हे दिसून येते.