शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पाणीटंचाई दूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 01:28 IST

दरवर्षीच्या उन्हाळ्यात गडचिरोली शहराच्या विविध वॉर्डातील पाणीटंचाईचा प्रश्न जटील होत असतो. पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गडचिरोली पालिकेच्या वतीने दोन वॉर्डात नवीन पाणी टाकी व नळ पाईपलाईन तसेच शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजनेची कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देपालिकेने निविदा मागविल्या : गडचिरोलीत कोट्यवधींच्या नळ योजनेचे काम होणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दरवर्षीच्या उन्हाळ्यात गडचिरोली शहराच्या विविध वॉर्डातील पाणीटंचाईचा प्रश्न जटील होत असतो. पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गडचिरोली पालिकेच्या वतीने दोन वॉर्डात नवीन पाणी टाकी व नळ पाईपलाईन तसेच शहरासाठी वाढीव पाणी पुरवठा योजनेची कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. सदर तिन्ही मोठी कामे झाल्यानंतर शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यादृष्टिकोनातून पालिका प्रशासनाने हालचाली वाढविल्या आहेत.पालिका प्रशासनाच्या वतीने येथील सुभाष वार्ड व फुले वॉर्डासाठी पाच लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी व नळ पाईपलाईनचे काम मंजूर करण्यात आलले आहे. या कामासाठी शासनाकडून पालिकेला २ कोटी ६ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पालिकेच्या वतीने निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली असून निविदा मागविल्या आहेत. प्रशासनाकडे तीन ते चार निविदा प्राप्त झाल्या असून येत्या तीन-चार दिवसात सदर कामाचे संबंधित कंत्राटदारांना वर्कआदेश देण्यात येणार आहे. पाणी योजनेच्या संदर्भात राज्याच्या नगर विकास विभागाने अलीकडेच एक शासन निर्णय काढून ९.९९ अधिक दर कामाला द्या, असे पालिकेला सुचित केले आहे. सध्याच्या सीएसआरनुसार वाढत्या दराने नगर विकास विभागाने पाणी योजनेच्या कामात बदल केला आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने प्रशासकीय कार्यवाहीला गती देण्यात आली आहे. लवकरच या पाणी टाकीचे काम सुरू होणार असून शहराच्या सुभाष व फुले वार्डातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे.विसापूर, विसापूर टोली हा चढ भाग असल्याने येथे दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होतो. पालिकेच्या वतीने उन्हाळ्यात विसापूर या एकमेव भागात टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. येथील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पालिकेच्या वतीने विसापूर भागात पाच लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी व नळ पाईपलाईनचे काम मंजूर करण्यात आले. यासाठी पालिकेला २ कोटी १६ लाख रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे. पालिकेच्या वतीने या कामाचा परिपूर्ण प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे.प्राधिकरणाकडून मान्यता मिळाल्यानंतर पालिकेकडून प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.४५ कोटीची वाढीव पाणी पुरवठा योजना प्रस्तावितशहरातील अनेक वॉर्डातील नळ पाईपलाईन फार जुनी आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे. परिणामी शहरात पाण्याचे असमान वाटप होते. यातून उन्हाळ्यात बऱ्याच कुटुंबांना पुरेशे पाणी मिळत नाही. यावर मात करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने तब्बल ४५ कोटींची वाढीव पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबत पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बहुमताने ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर या बाबतचा परिपूर्ण प्रस्ताव शासन व महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे. सदर योजनेसाठी जिल्हा विकास निधीतून पालिकेला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालिकेच्या वतीने पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली आहे.दोन टाक्यांचे होणार बांधकाम४५ कोटी रूपयांच्या निधीतून वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत शहरात दोन नवीन पाणीटाकीचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामध्ये गोकुलनगर भागात सात लाख लिटर क्षमतेची व इंदिरा गांधी चौक परिसरात १४ लाख लिटर क्षमतेची टाकी उभारण्यात येणार आहे. याशिवाय बोरमाळा मार्गावरील फिल्टर प्लान्टवर एक अतिरिक्त पंप बसविण्यात येणार आहे. सदर योजनेंतर्गत अधिक क्षमतेची मोठी पाईपलाईन शहरात बसविण्यात येणार आहे. दरम्यान सर्व शहराचे झोन पाडून नवे वॉल्व बसविण्यात येणार आहे. जुन्या पाईपलाईनच्या ठिकाणी १०३ किमी अंतरावर नवी पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या संदर्भातील सर्व बाबी प्रस्तावात नमूद करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Waterपाणी