शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाणीटंचाई

By admin | Updated: March 28, 2017 00:38 IST

नगरपंचायतीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या नळ योजनेचे पाणी दोन दिवसांतून एकदा पुरविले जात आहे.

दोन दिवसाआड मिळते पाणी : आरमोरीतील महिलांची पाण्यासाठी भटकंती; नगरपंचायतीचे दुर्लक्षआरमोरी : नगरपंचायतीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या नळ योजनेचे पाणी दोन दिवसांतून एकदा पुरविले जात आहे. त्याचबरोबर शहरातील अनेक हातपंप बंद असल्याने उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच आरमोरी शहरात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. आरमोरी शहरातील बाजारपेठ, ताडुरवारनगर, शास्त्रीनगर, भगतसिंग चौकातील भाग, काळागोटा आदी भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सध्या उन्हाळा तापत असल्याने पाण्याची गरज लक्षात घेता नागरिकांवर पिण्याचे मुबलक पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र नागरिकांच्या मूलभूत मागणीकडे नगर पंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. शहरातील अनेक वार्डातील हातपंप नादुरूस्त आहेत. तर काही हातपंपांमधून दोन ते तीन गुंड पाणी भरल्यावर हातपंपावर पाणीच येत नाही, अशी अवस्था आहे. हातपंप दुरूस्तीकरिता विविध वार्डातून यापूर्वी अनेकदा निवेदन देऊन सूचना करूनही तांत्रिक अडचणी समोर करून नगर पंचायत प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. शहरातील बहुतांश वार्डांना दोन दिवसांतून एकदाच पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच घरगुती पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. नागरिकांना पिण्याचे शुध्द व मुबलक पाणी उपलब्ध करून देणे हे नगर पंचायतीची जबाबदारी आहे. मात्र या जबाबदारीकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. शहरात शुध्द पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात आले आहे. शहरातील शेगाव तसेच इतर अनेक भागातील नागरिकांनी नळ जोडणीची मागणी करूनही नगर पंचायतीचे पाणी या भागात पोहोचले नाही. पिण्याच्या पाण्या संर्भात अनेक समस्या आहेत. नगर पंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. (वार्ताहर)टिल्लू पंपांकडे दुर्लक्षशहरातील काही नागरिक नळाला टिल्लूपंप लावतात. त्यामुळे बहुतांश नळधारकांना पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. टिल्लूपंप हे अवैध असून सदर पंपधारकांवर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र नगर पंचायतीचे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरातील पाण्याची समस्या सोडण्यिासाठी नगर पंचायत प्रशासनाला अनेकदा निवेदन देण्यात आले आहे. मात्र नगर पंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नगर पंचायत प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री भारत बावनथडे यांनी दिला आहे.