शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

७४ कोटी रूपयातून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 21:54 IST

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामे करण्यासाठी १२७ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये २०१८-१९ या आर्थिक वर्षात सुमारे ७४ कोटी रूपयांची कामे केली जाणार आहेत. यातील काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.

ठळक मुद्दे४,५१९ कामांना मंजुरी : जलयुक्त शिवार अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामे करण्यासाठी १२७ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये २०१८-१९ या आर्थिक वर्षात सुमारे ७४ कोटी रूपयांची कामे केली जाणार आहेत. यातील काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.जिल्ह्यातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. मात्र सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने सदर व्यवसाय तोट्याचा ठरत चालला आहे. धानाच्या शेतीसाठी अगदी सुरूवातीपासून सिंचनाची गरज असते मात्र मोठे सिंचन प्रकल्प नाहीत. तलाव, बोड्यांच्या माध्यमातून सिंचन केले जाते. मात्र दिवसेंदिवस या साधनांची पाणी साठवण क्षमता कमी होत चालली आहे. त्यांचे खोलीकरण करणे गरजेचे झाले आहे. तलाव, बोड्यांचे खोलीकरण झाल्यास सिंचनाची सुविधा उपलब्ध होते तसेच भूजल पातळीतही वाढ होण्यास मदत होते. या दोन्ही उद्देशानेच शासनाने जलयुक्त शिवार अभियान हा उपक्रम सुरू केला आहे.जलयुक्त शिवार अभियानची कामे विविध विभागांच्या मार्फतीने केली जातात. यामध्ये प्रामुख्याने कृषी विभाग, पंचायत समिती, लघुसिंचन विभाग, जलसंधारण विभाग, जलसंपदा विभाग, वनविभाग आदींचा समावेश आहे. या सर्व विभागांना निधी उपलब्ध करून देऊन काम पूर्ण करण्याची जबाबदारी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने जलयुक्त शिवारची कामे करण्यास मोठा वाव आहे.मुख्यमंत्र्यांनीही गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे कामे प्रगतीपथावर आहेत. २०१८-१९ या वर्षात जलयुक्त शिवारच्या कामांवर सुमारे ७४ कोटी ४२ लाख रूपये खर्च करण्याचे नियोजन केले आहे. या निधीतून सुमारे ४ हजार ५१९ कामे केली जाणार आहेत. कृषी विभागाने २ हजार २२८ कामे मंजूर केली आहेत. या कामांसाठी २४ कोटी रूपये खर्च येणार आहे. पंचायत समिती विभागाने २५० कामे मंजूर केली आहेत. त्यावर तीन कोटी रूपये खर्च येणार आहे. जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने ७२ कामे मंजूर केली आहेत. त्यावर ११ कोटी ५७ लाख रूपये खर्च होणार आहेत. जलसंधारण विभागाने ४२ कामे मंजूर केली. त्यावर ८ कोटी ७३ लाख रूपये खर्च होणार आहेत. जलसंपदा विभागाने केवळ ३ कामे मंजूर केली. त्यावर ८२ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. वनविभागाने १ हजार ९२४ कामे मंजूर केली आहेत. त्यावर ४५ कोटी १९ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे.कामे पूर्ण कराशासनाकडून निधी प्राप्त होतो. मात्र सदर निधी खर्च केला जात नाही. ही गडचिरोली जिल्ह्यातील मुख्य अडचण आहे. कामे सुरू करून ती पूर्ण करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार