शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पेंढरीत जलसंधारणाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:32 IST

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१७-१८ या वर्षात धानोरा तालुक्यातील १४ गावांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसिंचनाची कामे करण्यावर भर : शिवारफेरीच्या माध्यमातून केली जलसाठ्यांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत २०१७-१८ या वर्षात धानोरा तालुक्यातील १४ गावांची निवड करण्यात आली आहे. पेंढरी येथे रविवारी जलस्त्रोतांची पाहणी करून जलसंधारणाच्या कामाचे नियोजन करण्यात आले. यासाठी ग्रामस्थांच्याही सूचना स्वीकारण्यात आल्या.पेंढरी येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पेंढरीच्या सरपंच दूरदशुना आतला, जिल्हा परिषद सदस्य तथा जलव्यवस्थापन समिती सदस्य श्रीनिवास दुल्लमवार, पंचायत समिती रोशनी पवार, छबलला बेसरा, नामदेव लेनगुरे, एकनाथ परचाके, नंदू गावतुरे, महादेव गावडे, सुरेश येरमे, गिरमा जेंगठे उपस्थित होते.कृषी सहायक दिनेश पानसे यांनी अभियानाची पार्श्वभूमी व महत्त्व तसेच पाण्याचा टाळेबंद गावातील पाण्याची गरज उपलब्ध जलसाठा, आवश्यक पाणी व त्यानुसार करावयाच्या कामाचे नियोजन आदी तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. नायब तहसीलदार डी.आर. भगत, वनपाल, पी.एम. चौधरी, तलाठी एस.के. आडे यांनी विभागाची कामे याविषयीची माहिती दिली. संचालन ग्रामसेवक जयंत मेश्राम यांनी केले. जि. प. सदस्यांनीही मार्गदर्शन केले.१७ हेक्टरवर मजगीची कामेजलयुक्त शिवार कार्यक्रमाअंतर्गत कामाचे नियोजन करण्यासाठी गावाच्या सभोवताल शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले. पेंढरी शेतशिवारातील चार बोड्या, एक तलाव, तीन सिंचन विहिरी, एक वनतलाव, दोन शेततळे यांची पाहणी करण्यात आली. ग्रामस्थांनी गावतलावातील गाळ काढणे, माती नाल्याचे बांधकाम करणे, १७ हेक्टरवर मजगीची कामे करणे, तीन बोड्यांचे नूतनीकरण करणे, आठ सिंचन विहिरींमधील गाळ काढणे, तीन वनतलावांची दुरूस्ती करणे व एक लघुसिंचाई बंधारा बांधण्याबाबतच्या कामांचे नियोजन करण्यात आले.धानोरा तालुक्यातील १४ गावांची जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये जलसिंचनाची सुविधा वाढविण्याबरोबरच जलसंधारण करण्याबाबत नियोजन करण्याचे काम गावकºयांच्या मदतीने सुरू झाले आहे.