शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

गोदाम बांधकामाचे देयक रखडले

By admin | Updated: April 1, 2016 01:56 IST

शासकीय अन्नधान्य वितरण प्रणालीद्वारे पुरवठा होणाऱ्या धान्याच्या साठवणुकीसाठी बांधण्यात आलेल्या गोदाम बांधकामाचे देयक रखडल्याने ...

सिरोंचा : शासकीय अन्नधान्य वितरण प्रणालीद्वारे पुरवठा होणाऱ्या धान्याच्या साठवणुकीसाठी बांधण्यात आलेल्या गोदाम बांधकामाचे देयक रखडल्याने संबंधित कंत्राटदार अडचणीत आला आहे. ३१ मार्च अखेर संपणारे वित्तीय वर्ष पूर्ण व्हायला एक दिवस उरला असतानाही संबंधित विभागाकडून यासंदर्भात हालचाल दिसून येत नाही. दरम्यान काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने कर्जाऊ घेतलेल्या घेणेकऱ्यांचे तगादे वाढल्याने कंत्राटदार कचाट्यात सापडला आहे. सिरोंचा येथील तहसील कार्यालयासमोर व उपकोषागार कार्यालयाच्या बाजूला या गोदामाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दोन्ही इमारती स्वतंत्रपणे वेगवेगळ्या आहेत. पूर्वी प्रस्तावित आराखड्यानुसार एकच इमारत निर्माणाधीन होती. त्याची अंदाजपत्रकीय रक्कम २ कोटी ४१ लक्ष रूपये आहे. मात्र त्यासाठी भूखंड अपुरा पडल्याने दोन इमारती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र इमारतीच्या सभोवताल अंतर्गत रस्त्यात अधिकची भर पडल्याने अंदाजपत्रकीय रकमेत वाढ होऊन ती २ कोटी ८० लक्ष रूपये झाली. डिसेंबर २०१३ मध्ये सुरू झालेले बांधकाम निर्धारित मुदतीत पूर्ण झाले. एक वर्षापूर्वीच संबंधित विभागाला सदर इमारती हस्तांतरित करण्यात आल्या. अन्न महामंडळाकडून आवक होणाऱ्या धान्याची साठवणुकही या गोदामात सुरू झाली. मात्र प्रत्यक्ष कागदोपत्री हस्तांतरण प्रक्रिया दीड महिन्यापूर्वी पार पडली, अशी चर्चा आहे. अंदाजपत्रकीय रकमेत वाढ झालेल्या अतिरिक्त खर्चाची जुळवाजुळव करण्यासाठी कंत्राटदाराने सावकारांकडून कर्ज घेतले. सदर कर्ज निर्धारित मुदतीत अदा न झाल्याने घेणेकऱ्यांनी कंत्राटदाराच्या मागे तगादा लावला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराचे गावात येणेही बंद झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)