शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

४५ हजार ३५० हेक्टरला सिंचनाची प्रतीक्षा

By admin | Updated: February 15, 2015 01:04 IST

गडचिरोली जिल्हा निर्माण होऊन ३३ वर्ष झाली. परंतु या जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यात राज्य सरकारला कमालीचे अपयश आले आहे.

अहेरी : गडचिरोली जिल्हा निर्माण होऊन ३३ वर्ष झाली. परंतु या जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यात राज्य सरकारला कमालीचे अपयश आले आहे. अहेरी उपविभागात ५० हजार १०० हेक्टर पिकाखालील क्षेत्रापैकी ४५ हजार ३५० हेक्टर जमिन अजुनही सिंचनाखाली आणण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे दारिद्र्य दिवसेंदिवस वाढत आहे. अहेरी उपविभागात भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी, मुलचेरा हे पाच तालुके येतात. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार ५० हजार १०० हेक्टर जमिन पिकाखाली आहे. त्यापैकी ४ हजार ५५० हेक्टर जमीन ओलीताची आहे. तर ४५ हजार ५५० हेक्टर आर जमिन कोरडवाहू आहे. पावसाच्या भरवश्यावर या भागातील शेतकरी शेती करीत आहे. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, आदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बोडी, शेततळे, बंधारे, मजग्या आदीचे कामे करण्यात आली. प्रत्यक्षात सर्व कामे कागदोपत्रीच झाल्याने अहेरी उपविभागात केवळ १० टक्यापेक्षा कमी सिंचन व्यवस्था निर्माण होऊ शकली. अहेरी तालुक्यात १५ हजार हेक्टर आर क्षेत्र पिकाखाली आहे. यातील १ हजार हेक्टर क्षेत्र ओलीताचे तर १ हजार ४०० हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे. एटापल्ली तालुक्यात १३ हजार ७०० हेक्टर क्षेत्र पिकाखाली असून ५५० हेक्टर क्षेत्र ओलीताचे तर १३ हजार १५० कोरडवाहू क्षेत्र आहे. भामरागड तालुक्यात ७ हजार ९०० हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. पैकी ५०० हेक्टर क्षेत्रावर ओलीताची सोय आहे. ७ हजार २०० हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे. सिरोंचा तालुक्यात १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. पैकी २ हजार ५०० हेक्टर क्षेत्र ओलीताचे तर ११ हजार हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे. गडचिरोली जिल्ह्यात सिंचन सुविधा वाढविण्यासाठी आजवर आदिवासी विकास विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सिंचन विभाग, कृषी विभाग यांच्याकडून लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु याचा कोणताही फायदा अजूनपर्यंत दिसलेला नाही. (शहर प्रतिनिधी)चेन्ना प्रकल्प रखडलामुलचेरा तालुक्यातीत चेन्ना प्रकल्पाचे काम रखडले असून त्यावेळी धारणाच्या २१़७० मीटर उंचीची भिंत व १० मीटर काम झाल्यानंतर प्रकल्पाचे काम बंद करण्यात आले़ १४ किमीचा कालवा बांधण्यात आला़ या प्रकल्पामुळे २२३० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार होते़ प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर चेन्ना प्रकल्प पूर्ण करण्याचा आश्वासन दिले जाते. विद्यमान पालकमंत्री अम्ब्रीशराव महाराज यांनी सुंदरनगर येथे प्रचारसभेत चेन्ना प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दिले आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांना मोठी आशा आहे.दोन उपसा सिंचन योजनांना नव्याने मान्यता घ्यावी लागणार अहेरी तालुक्यातील देवलमारी व महागाव गर्रा या दोन उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली होती. मात्र वनकायदा आड आल्याने तसेच भूसंपादनाची प्रक्रिया न झाल्याने या दोन्ही सिंचन योजनेचे काम सुरू होऊ शकले नाही. या दोन्ही उपसा सिंचन योजनेची मान्यता व्यपगत झाली आहे. मंजुरीची मुदत संपल्यामुळे पाटबंधारे विभागाला नव्याने प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडून या दोन्ही सिंचन योजनेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. नवीन दराने सदर प्रकल्प सुरू करावा लागणार असून याची किंमतही वाढणार आहे.अहेरी उपविभागातील बांधकामाधीन प्रकल्पाची सद्यस्थितीसिरोंचा तालुक्यातील रेगुंठा उपसा सिंचन योजनेला १६ सप्टेंबर २००८ ला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यावेळी या प्रकल्पाची किमत ३५ कोटी होती. मार्च २०१४ पर्यंत ०.११ लाख रूपयांचा खर्च या योजनेवर झाला. १ एप्रिल २०१४ ला उर्वरित किमत ३४.८९ कोटी आहे. या प्रकल्पामुळे २०५२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. २०१४-१५ करिता ०.५० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प अगदीच प्राथमिक अवस्थेत असल्याची माहिती चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळाने दिली आहे.एटापल्ली तालुक्यातील डुम्मी नाला, मुलचेरा तालुक्यातील चेन्ना या दोन प्रकल्पांना वनबाधिक प्रकल्पाच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. चेन्नासाठी ११८.२३ हेक्टर तर डुम्मी नालासाठी ३७५.४५ हेक्टर वनजमिन लागणार आहे. मार्च २०१४ अखेर डुम्मी नालावर ०.७७ लाख रूपयाचा खर्च करण्यात आला आहे. तर चेन्नाला १.४३ लाख रूपयांचा खर्च झाला आहे.सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका, टेकडा, अहेरी तालुक्यातील महागाव, देवलमरी, मुलचेरा तालुक्यातील शांतीग्राम हे प्रकल्प अन्वेषणाखालील प्रकल्प आहे. पेंटीपाका प्रकल्पाची अध्यावत किमत ४३.०४ कोटी असून २२१८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. १०.७० हेक्टर वनजमिन लागणार आहे. शांतीग्राम प्रकल्पाची अध्यावत किमत ५३.७४ कोटी असून २१०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ९.३० हेक्टर वनजमिन लागणार आहे. महागाव गर्रा या प्रकल्पाची अध्यावत किमत ३९.७७ कोटी तर देवलमरी प्रकल्पाची किमत ४५.०५ कोटी आहे. महागाव गेर्रामुळे ३४५० हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. देवलमरीमुळे ३३.५५ हेक्टर वनजमिन सिंचनाखाली येईल. या प्रकल्पाचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.