शेतकर्यांना दिलासा: लवकरच मिळणार वीज कनेक्शनब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी परिसरात मागील दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव सादर केलेल्या ६00 शेतकर्यांच्या कृषीपंपाकरिता वीजजोडणी मिळणार आहे. याबाबत सादर झालेले अर्ज धूळखात असून वीजजोडणीअभावी शेतकर्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत होते.निसर्गाच्या लहरीप्रमाणे पावसाचे प्रमाण असल्याने शेतकरी अडचणीत आला.विहिरीत पाणी असूनसूद्धा ते पिकाला देऊ शकत नाही. याला कारण म्हणजे कृषीपंपाला नसलेला वीजपुरवठा परिणामी उभे पीक डोळ्यांसमोर वाळत होते.शेतकर्यांचे अशी अवस्था असताना सुद्धा वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले होते. शेतकर्यांनी तथा आमदार अतुल देशकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून व्यथा शासनासमोर मांडल्या. दरम्यान शेतकर्यांच्या कृषीपंपाच्या वीजजोडणीकरिता शासनाकडून ४५0.४६ लाख रुपये मंजूर झाले आहे. यामुळे हे काम त्वरीत सुरू करावे व शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती शेतकर्यांनी केली आहे.सदर काम आदित्य इलेक्ट्रिकल्स व पद्मावती इलेक्ट्रिकल्स यांना देण्यात आले असून ब्रह्मपुरी विभागात ३00 पंपांना, सिंदेवाही विभागत ९७, तर सावली तालुक्यातील ११४शेतकर्यांच्या कृषीपंपांना मंजुरी मिळाली आहे. ज्यांनी नोव्हेंबर २0१३ पर्यंत अर्ज सादर केले. अशा शेतकर्यांना कृषीपंपाकरिता वीजखांब त्यावरील तार लावून वीजजोडणी मिळणार आहे. या वीजजोडणीकरिता ६३ केव्हीचे ४७ ट्रान्सफार्मर तर १00 केव्हीचे ९व २५ केव्हीचे ट्रान्सफार्मर लागणार असून कामाला लवकरच सुरूवात होऊन शेतकर्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकर्यांच्या व्यथा समजून लगेच वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने शेतकर्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.मागील अनेक दिवसांपासूनची मागणी लवकरच पूर्ण होणार असून शेतकर्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील शेतकर्यांना वीज पुरवठा त्वरित द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
शेतकर्यांची प्रतीक्षा संपली
By admin | Updated: May 15, 2014 02:08 IST