शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

धानाच्या हमीभावाची प्रतीक्षा

By admin | Updated: January 3, 2015 01:18 IST

जिल्ह्यातील धानपीक निघाले आहे. परंतु अनेक तालुक्यातील गावांमध्ये अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत.

देसाईगंज : जिल्ह्यातील धानपीक निघाले आहे. परंतु अनेक तालुक्यातील गावांमध्ये अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू होण्याची तसेच धानाला हमी भाव मिळण्याची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात धानपीक प्रमुख पीक म्हणून ओळखले जाते. अनेक शेतकरी खरीप धानपिकाची लागवड करतात. काही शेतकरी उन्हाळी धानपिक लावगड करतात. मात्र धानपिक निघाल्यानंतर शेतकऱ्यांना हमीभावाची प्रतीक्षा असते. हमीभाव मिळविण्यासाठी शेतकरी चळवळ उभारतात. मात्र या चळवळीला पाठबळ मिळत नसल्याचे चित्र आहे. धान निघाल्यानंतर अनेक गावांमध्ये खासगी व्यापारी आपला धंदा थाटतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान मातीमोल किमतीत खासगी व्यापाऱ्यांच्या घश्यात जात असते. आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत अनेक गावांमध्ये धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु अनेक गावांना धान खरेदी केंद्राची अद्यापही प्रतीक्षा आहे. परिणामी शेतकऱ्यांना हमीभाव मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष होते. कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्ता भत्ता दिला जातो. मात्र शेतकऱ्यांना हमीभावही दिला जात नाही. संपूर्ण जिल्हा नक्षलग्रस्त घोषित करण्यात आला आहे. नक्षलग्रस्त भत्ता अनेक कर्मचाऱ्यांना दिला जात आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हमीभावासाठी लढावे लागते. अशी परिस्थिती सद्यस्थितीत दिसून येत आहे. शेतकऱ्यांची दैनावस्था झाल्याने त्यांना सरकारचे तसेच लोकप्रतिनिधींचे पाठबळ मिळत नसल्याचे दिसून आले आहे. (वार्ताहर)धान खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंबजिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र सिरोंचा तालुक्यातील तीन आष्टी परिसरातील, आरमोरी तालुक्यातील अनेक धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान्य खासगी व्यापाऱ्यांना मातीमोल किंमतीत विकावे लागत आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत आहे. धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.