शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कैकाडी वस्तीला विकासाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:22 IST

चामोर्शी मार्गावरील शहरापासून थोड्या दूर अंतरावर असलेल्या कैकाडी वस्तीत नगर परिषदेने अजूनपर्यंत कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.

ठळक मुद्देरस्ता, पाणी या मूलभूत सुविधांचा अभाव : नगर परिषदेचे मागील सात वर्षांपासून दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी मार्गावरील शहरापासून थोड्या दूर अंतरावर असलेल्या कैकाडी वस्तीत नगर परिषदेने अजूनपर्यंत कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांना अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे.कैकाडी समाजाचे नागरिक शहरात कुठेही वास्तव्याने राहत होते. तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटने यांनी पुढाकार घेत चामोर्शी मार्गावर शहरापासून काही दूर अंतरावर कैकाडी समाजातील नागरिकांसाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर या समाजाच्या नागरिकांनी त्या ठिकाणी झोपड्या उभ्या केल्या. ही वस्ती वसल्याला जवळपास सात वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र नाली, रस्ता यासारख्या मूलभूत सोयीसुविधा सुध्दा उपलब्ध करून दिल्या नाहीत. वस्तीच्या दोन्ही बाजुला घरे आहेत. वस्तीतील मध्यभागी असलेल्या मार्गाचे केवळ माती वजा खडीकरण करण्यात आले आहे. या मार्गाचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रीटीकरण झाले नाही. रस्त्याच्या बाजुला नाली बांधण्यासाठी खोदकाम झाले आहे. मात्र नाली बांधली नाही. रस्ता उंच करण्यासाठी नालीप्रमाणे खोदकाम करण्यात आले असावे, अशी शक्यता आहे. येथील नागरिकांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असल्याने काही नागरिकांनी साध्या ताडपत्री अंथरून तर काही नागरिकांनी टिन टाकून झोपड्या तयार केल्या आहेत. या वस्तीत जाण्यासाठी रस्ता नसून पायवाटेने जावे लागते. वस्तीच्या बाहेर शेतात जुनी खासगी विहीर आहे. या विहिरीच्या पाण्यावर सदर कुटुंब आपली तहाण भागवित आहेत. न.प.ला कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध होतो. मानवी दृष्टीकोन लक्षात घेऊन येथील मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी होत आहे. मात्र नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.