शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वीज खांबांना अपघाताची प्रतीक्षा

By admin | Updated: July 27, 2016 01:46 IST

आरमोरी शहरातील मुख्य मार्गाच्या बाजूला असलेले खांब आजपर्यंत एमएसईबीने अपघात झाल्यानंतरच बाजुला केले आहेत.

वीज विभागाचे होत आहे दुर्लक्ष : आरमोरीत अपघातांचे प्रमाण वाढले; वाहतुकीच्या खोळंब्याने नागरिक त्रस्त विलास चिलबुले  आरमोरी आरमोरी शहरातील मुख्य मार्गाच्या बाजूला असलेले खांब आजपर्यंत एमएसईबीने अपघात झाल्यानंतरच बाजुला केले आहेत. सद्य:स्थितीत आता चार खांब रस्त्यावर आहेत. मात्र सदर खांब अजूनपर्यंत बाजुला करण्यात आले नाही. त्यामुळे एमएसईबी सदर खांब हटविण्यासाठी एखाद्या मोठ्या अपघाताचीच प्रतीक्षा करीत असावी, असा उपरोधिक सवाल आरमोरी शहरातील नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणीसुद्धा होत आहे. आरमोरी शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर असल्याने या शहरातून नागपूर, गडचिरोली, देसाईगंज व ग्रामीण भागात जाणाऱ्या बसफेऱ्या तसेच जड वाहने ये-जा करतात. त्यामुळे येथील मुख्य मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. शहराच्या विस्तारानंतर अतिक्रमण हटवून मुख्य मार्गाचाही विस्तार करण्यात आला. मात्र मार्गावर असलेले वीज विभागाचे खांब हटविण्यात आले नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत या मार्गावर १० खांब होते. त्यापैकी चार खांब रस्त्याच्या बाजुला होते. उर्वरित सहा खांब रस्त्यावर आले होते. यापैकी दोन खांबांना ट्रकने धडक दिली. या धडकेत सदर खांब पूर्णपणे वाकून निकामी झाले. त्यानंतर सदर खांब वीज विभागाने नव्याने लावून ते रस्त्याच्या बाजुला गाडले. त्याचवेळी उर्वरित चार खांब रस्त्याच्या बाजुला केले असते तर ही समस्या तेव्हाच मिटली असती. मात्र एमएसईबीने तुटलेले दोन खांबच बाजुला गाडले. उर्वरित बँक आॅफ इंडिया, भगतसिंग चौकातील सोमनकर यांच्या घरासमोरील, पंचायत समिती समोरील व बर्डीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळील चार खांब अजूनही रस्त्यावरच आहेत. सदर खांब वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहेत. या खांबामुळे वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होतो. त्यामुळे सदर खांब हटविणे अत्यंत आवश्यक असले तरी एमएसईबीने याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. सदर खांब तत्काळ हटवावे, अशी मागणी आहे. खांबांच्या आड अवैध पार्र्किं ग व अतिक्रमण वाढले रस्त्यावर असलेल्या वीज खांबांमुळे ये-जा करणारी वाहने रस्त्याच्या बाजूने जाऊ शकत नाही. त्यामुळे वीज खांबाच्या बाजूची जागा सुरक्षित मानली जाते. या जागेपर्यंत काही दुकानदारांनी दुकानांचा विस्तार केला आहे व त्या ठिकाणी दुकाने थाटली आहेत. त्याचबरोबर या वीज खांबांच्या आड खासगी प्रवासी वाहने उभी केली जातात. याच ठिकाणावरून प्रवाशांचीही वाहतूक करतात. या चार खांबांनी आरमोरीच्या वाहतूक व्यवस्थेची पार वाट लावली आहे. त्यामुळे सदर खांब हटविणे आवश्यक झाले आहे.