शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वडसा अंडरब्रिज जानेवारीपर्यंत पूर्ण होणार

By admin | Updated: November 13, 2016 02:03 IST

जिल्ह्यातील एकमेव वडसा-गडचिरोली या ५२.१३ किमी रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी जमीन अधिग्रहणाची

खासदारांची माहिती : वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामाबाबत चर्चागडचिरोली : जिल्ह्यातील एकमेव वडसा-गडचिरोली या ५२.१३ किमी रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी जमीन अधिग्रहणाची कार्यवाही तत्काळ पूर्ण करून रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. तसेच वडसा अंडरब्रिजचे काम जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली. नागपूर येथे दक्षिण-पूर्व मध्यरेल्वेच्या विभागीय कार्यालयात आयोजित मंडलस्तरीय समितीच्या बैठकीत रेल्वे स्थानकाच्या अडचणी व समस्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला बालाघाट-शिवणी लोकसभा क्षेत्राचे खासदार बोधसिंग भगत, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, रेल्वेचे दक्षिण-पूर्व मध्यरेल्वेचे महाप्रबंधक सत्येंद्रकुमार, मंडल रेल्वे प्रबंधक, अमितकुमार अग्रवाल, उपमहाप्रबंधक डॉ. प्रकाशचंद्र त्रिपाठी, महाप्रबंधकांचे सचिव हिमांशू जैन, मुख्य परिचालन प्रबंधक जे. एन. झा, मुख्य प्रशासकीय अधिकारी एस. के. सिंगला, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक अर्जुन सिब्बल, अनिल कुमार, शिवराज सिंह उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)जमीन अधिग्रहणाची ६० टक्के कार्यवाही पूर्णवडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी जमीन अधिग्रहणाची ६० टक्के कार्यवाही पूर्ण झाली आहे. तसेच भूमीअधिग्रहणाबाबत भूमीप्लॅन व प्रोजेक्टच्या पूर्ण लांबीचे शेड्युल यापूर्वीच जून २०१६ मध्ये पाठविण्यात आले आहे. भूमीप्लॅनचे राजस्व कागदपत्रासह सत्यापण आॅक्टोबर २०१६ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदारांच्या प्रश्नाला दिली.