शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

वडसाची रेल्वे वाहतूक डिजिटल

By admin | Updated: July 18, 2016 02:15 IST

अतिदुर्गम, आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव वडसा रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाडी आवागमन आधुनिकीकरण करण्यात आले

सुरक्षेत वाढ : वेळेचीही झाली बचत; पर्यायी सिग्नल व्यवस्था देसाईगंज : अतिदुर्गम, आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव वडसा रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाडी आवागमन आधुनिकीकरण करण्यात आले असून पूर्णत: डिजिटल झाली आहे. त्यामुळे आता सुरक्षितेत वाढ होणार व वेळेचीही बचत होणार आहे. वडसा रेल्वे स्टेशनवरील संपूर्ण रेल्वे आवागमन वाहतूक मॅन्युअल होती. रस्ता रहदारीवरील गेट पाडणे, दोन रेल्वे गाडीची क्रॉसिंग, रेल्वे गाडीच्या आवागमणासाठी देण्यात येणारे सिग्नल यासाठी टोकन प्रणाली कार्यान्वीत होती, ही प्रणाली किचकट व क्लिष्ट होती, यात वेळेचा अपव्यय तसेच असुरक्षिता निर्माण होत होती, तेव्हापासून आतापर्यंत हीच कार्यपद्धती अवलंबली जात होती. वडसा रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाडी आवागमन संदर्भात आमूलाग्र बदल होऊन मॅन्युअल पद्धती संपुष्टात आणून कम्प्यूटराईज्ड रेल्वे स्टेशन डिजिटल झाले आहे. यात दोन गाडींच्या क्रॉसिंगच्या दरम्यान कमीतकमी १० ते २० मिनिटांची बचत होत असून सोबतच सुरक्षितेत वाढ होणार आहे. पूर्वी सिग्नल सिस्टिममध्ये बिघाड आल्यास रेल्वे गाडीच्या रेल्वे स्थानकावर आगमन होण्यास फारच विलंब होत होता, मात्र आता संपूर्ण कार्यपद्धती डिजिटल होऊन कम्प्युटराइज्ड झाल्याने आता वैकल्पिक सिग्नलची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय थांबून बचत होणार आहे. तसेच इंग्रजांच्या कार्यकाळापासून प्रचलित कार्यपद्धतीत रस्ता रहदारीवरील गेट पाडण्यासाठी जवळपास तब्बल २० ते २५ मिनट लागत होते व वाहतूक जाम होत होती. आता डिजिटल झाल्याने १० ते १५ मिनिट लागणार आहेत. यामुळे गतिमानता प्राप्त झाली आहे. वडसा रेल्वे स्टेशन डिजिटल कार्यपद्धती अधीक्षक पी. एस. भोंडे, वरिष्ठ स्टेशन मास्टर संजय कुमार, कनिष्ठ स्टेशन मास्टर रितेश कुमार हाताळत आहेत. (तालुका प्रतिनिधी)