देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या वडसा रेल्वे स्टेशनच्या वडसा रेल्वे सल्लागार समितीत शहरातील दहाजणांची नियुक्ती केल्याबाबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूरच्या विभागीय कार्यालयाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्यिक व्यवस्थापक यांनी नियुक्तीचे आदेश निर्गमित केले आहे.
नवनियुक्त वडसा रेल्वे सल्लागार समितीमध्ये राजेश जेठानी, डॉ. विष्णू वैरागडे, दीपक विधाते, नरेश विठलानी, नगराध्यक्ष शालू दंडवते, संतोष शामदासानी, कोंडधारी नाकाडे, सचिन खरकाटे, प्रीतपालसिंग टुटेजा आणि ऋषी शेबे या दहाजणांचा समावेश आहे. ही नियुक्ती दोन वर्षांसाठी केल्याचे नियुक्ती आदेशात नमूद केले आहे. नवनियुक्त वडसा रेल्वे सल्लागार समिती कार्यकारिणीचे श्रेय खासदार अशोक नेते यांना देण्यात आले आहे.
बाॅक्स...
समितीची भूमिका महत्त्वाची
वडसा रेल्वे स्टेशनच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे सल्लागार समितीची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. वडसा रेल्वे सल्लागार समितीने मागील सहा वर्षांपासून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने मागणी व पाठपुरावा केल्यानेच वडसा रेल्वे स्टेशनवर अनेक विकासात्मक योजना राबविण्यात आल्या आहेत.