शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

माल्लेरमालमध्ये गिधाडांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:35 IST

चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा माल वनपरिक्षेत्रात येणाऱ्या माल्लेरमाल येथील कक्ष क्र. ११० च्या वनक्षेत्रात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुर्मिळ गिधाड पक्षी आढळून आले.

ठळक मुद्देसव्वाशेवर गिधाडे आढळली : नागपूरच्या अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा माल वनपरिक्षेत्रात येणाऱ्या माल्लेरमाल येथील कक्ष क्र. ११० च्या वनक्षेत्रात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दुर्मिळ गिधाड पक्षी आढळून आले. संख्येने १२० ते १४० च्या आसपास असलेल्या गिधाडांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळताच ५ जानेवारीला नागपूरचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक के.पी. सिंग यांनी भेट देऊन पाहणी केली.माल्लेरमाल येथील कक्ष क्र. ११० च्या वनक्षेत्रात मृत जनावरांचे मांस खाण्याकरिता परिसरातील झाडांवर तसेच समुहाने घिरट्या घालत असल्याचे गिधाड पक्षी दिसून आले. मागील अनेक वर्षानंतर माल्लेरमाल येथे गिधाड पक्षी दिसून आले. ३ जानेवारी २०१८ पासूनच १२० ते १४० च्या आसपास गिधाडांचा वावर येथे असल्याचे माल्लेरमाल येथील नागरिकांनी सांगितले. भेटीदरम्यान अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक के.पी. सिंग यांनी उपस्थित वनाधिकारी, कर्मचारी, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी व गावातील नागरिकांशी संवाद साधून गिधाडांविषयी आणखी माहिती जाणून घेतली. तसेच वनकर्मचारी व गाववासीयांकडून करण्यात येणाºया गिधाड संरक्षण व संवर्धनाच्या कामाची प्रशंसा केली. जिल्ह्यातील गिधाडांची संख्या प्रचंड घटली आहे. गिधाड अतिशय दुर्मिळ झाले आहेत. परंतु माल्लेरमाल परिसरात गिधाड आढळले. वनकर्मचारी व वनाधिकारी गावातील नागरिकांना मार्गदर्शन करून गिधाड वाचविण्यासाठी जनजागृती करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भेटीदरम्यान गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक डब्ल्यू.आय. यॉटबान, गडचिरोलीचे उपवनसंरक्षक एस.बी. फुले, विभागीय वनाधिकारी यू.यू. वर्मा, सहायक वनसंरक्षक (रोहयो) सोनल भडके, कुनघाडाचे वनपरिक्षेत्राधिकारी जी.एम. घोंगडे, केंद्रस्थ अधिकारी मोतीराम चौधरी, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खुशालराव कावळे व नागरिक उपस्थित होते.चार गावात बांधले पक्षी उपाहारगृहगिधाड पक्ष्यांना जनावरांचे मांस उपलब्ध व्हावे, या उद्देशाने गडचिरोली वनविभागामार्फत संयुक्त वनव्यवस्थापन समिती येवली, दर्शनी चक यांच्या माध्यमातून येवली, दर्शनी चक, नवेगाव रै., मारकबोडी येथे गिधाड पक्षी उपहारगृह तयार करण्यात आले आहेत. या उपहारगृहांमध्ये नागरिक मेलेली जनावरे टाकतात. या जनावरांचा मोबदलाही पशुपालकांना दिला जातो. या उपहारगृहांमध्ये परिसरातील गिधाडांना ठेवण्यात आले आहे. तसेच गिधाड पक्ष्यांबाबत गावागावात जनजागृती करून त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याकरिता विविध उपक्रम राबविले जात आहे. गावकºयांचा प्रतिसाद व सहकार्य मिळत असल्यामुळे गिधाड पक्ष्यांची संख्या वाढत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी जी.एम. घोंगडे यांनी सांगितले.