शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गिधाड पर्यावरणाचे स्वच्छतादूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 21:48 IST

मृत जनावरांचे मांस हेच गिधाडांचे खाद्य असल्याने मृत जनावरांपासून होणारे विविध आजार कमी करण्याचे काम गिधाड करतात.

ठळक मुद्देसोनल भडके यांचे प्रतिपादन : दर्शनी चक येथे गिधाड जनजागृती दिन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मृत जनावरांचे मांस हेच गिधाडांचे खाद्य असल्याने मृत जनावरांपासून होणारे विविध आजार कमी करण्याचे काम गिधाड करतात. गिधाडांमुळे स्वच्छता राखण्यासही फार मोठी मदत होते. मात्र गिधाडांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गिधाडांचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावा, असे आवाहन सहायक वनसंरक्षक सोनल भडके यांनी केले.सप्टेंबर महिन्यातील पहिला शनिवार आंतरराष्टÑीय गिधाड जनजागृती दिन म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त गडचिरोली तालुक्यातील दर्शनी चक येथे शनिवारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला कुनघाडाचे वन परिक्षेत्राधिकारी जी. एम. घोंगडे, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, दर्शनी मालच्या सरपंच शोभा कोठारे, नवेगाव रै.च्या सरपंच उषा दुधबळे, मुख्याध्यापिका कुमरे, अंजली कुळमेथे, दिलीप भांडेकर, उपसरपंच उमाजी पिपरे, नैताम, माजी सरपंच पत्रू कोठारे, दिनकर दुधबळे, सुधाकर वैरागडे, जयदेव कोठारे, वनपाल तथा केंद्रस्त अधिकारी मोतीराम चौधरी, वनपाल सालकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना सोनल भडके म्हणाल्या, डायक्लोफेनॅक औषधे, रासायनिक खते, कीटक नाशके व मानवी चुकांमुळे गिधाड नष्ट होत चालले आहेत. गिधाड मृतभक्षी असल्याने मृत जनावरांपासून होणारे अ‍ॅनथ्रेक्स, कॉलरा, रेबीज आदी आजार टाळले जातात. त्यामुळे गिधाडांचे संवर्धन करावे, असे आवाहन केले. संचालन वनपाल विशाल सालकर, तर आभार वनरक्षक चंदू डोईजड यांनी मानले. यशस्वीतेसाठी वनरक्षक तलमले, ढोणे, पेदीवार, टेकाम, आंबेडारे, गोटा यांनी सहकार्य केले. याप्रसंगी गिधाड संवर्धनाबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली.