नगर पंचायत निवडणूक : मतदानासाठी १७ पैकी एक पुरावा ग्राह्यगडचिरोली : नगर पंचायत व ग्राम पंचायत निवडणुकीत बोगस मतदानाला आळा बसावा यासाठी मतदाराला ओळखपत्र दाखविणे बंधनकारक आहे. मात्र हे ओळखपत्र जवळ नसल्यासही मतदाराला मतदानाचा हक्क जबावता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या १७ पुराव्यांपैकी एक पुरावा असल्यास तो मतदानासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत दिलेले राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे छायाचित्रांकित ओळखपत्र, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा फोटो असलेले पासबुक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विधवा, अवलंबित व्यक्ती यांचे छायाचित्रासह असलेले प्रमाणपत्र, वयस्क वेतनधारक अथवा त्यांच्या विधवा यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र, केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याच्या आधीच्या तारखेपर्यंत दिलेली शिधापत्रिका ग्राह्य धरण्यात येईल. मात्र यासाठी कुटुंबातील सर्व मतदारांनी मतदान करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. वरील प्रमाणपत्र मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येणार असल्याने मतदान केंद्रावरील अधिकारी व मतदारांची डोकेदुखी कमी होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल. (स्थानिक प्रतिनिधी)
ओळखपत्र नसले तरी करता येईल मतदान
By admin | Updated: October 25, 2015 01:17 IST