शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या वेळी मतदारांनी चोखंदळ असावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2017 01:59 IST

राष्ट्र उभारणीत मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. घर बांधतांना आपण प्रत्येक वस्तूची गुणवत्ता तपासतो,

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : निवडणुकीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव गडचिरोली : राष्ट्र उभारणीत मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. घर बांधतांना आपण प्रत्येक वस्तूची गुणवत्ता तपासतो, त्याचप्रमाणे मतदान करतानाही मतदारांनी चोखंदळ असावे, असे प्रतिपादन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केले. येथील पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कलादालनात मतदानाचा दिनाचा कार्यक्रम बुधवारी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, उपजिल्हाधिकारी जयंत पिंपळगावकर, तहसीलदार संतोष खांडरे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी मान्यवर उपस्थित होते. मतदारांमध्ये जागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता राज्य निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. यंदाचा सातवा मतदार दिन गडचिरोली जिल्हा प्रशासनातर्फे साजरा करण्यात आला. याप्रसंगी आयटीआयच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीने आदिवासी नृत्य सादर केले. तसेच पथनाट्य सादर करून मतदार जनजागृती केली. लोकशाहीच्या उभारणीत मतदारांनी आपले योगदान द्यावे व या कामात नवमतदारांनी पुढाकार घ्यावा, भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत आवर्जुन मतदान करणे गरजेचे आहे. याकरिता अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही मतदारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नायक यांनी यावेळी केले. याप्रसंगी मतदार नोंदणी व नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच नवमतदारांना प्रातिनिधीक स्वरूपात मतदान ओळखपत्राचे वाटप जिल्हाधिकारी नायक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी इतर मान्यवरांनीही लोकशाहीबाबत मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, नागरिक तसेच युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)