शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या भीतीमुळे शुगर, बीपी रुग्णांच्या उपचारात खंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 23:18 IST

एरव्ही नियमित तपासणीला जात असले तरी सध्या कोरोनाच्या भीतीने ते  घरीच पडून राहतात. आरमोरी तालुक्यासह जिल्हाभरात ही स्थिती असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सर्वांत जास्त रुग्ण हे शुगर, बीपी व इतर आजारांचे आहेत. ५० वर्षांवरील व्यक्तींमध्ये  हे आजार सर्रास दिसतात. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील शुगर-बीपीने ग्रस्त रुग्ण तालुकास्तरावरील शासकीय रुग्णालयात जाऊन नियमित तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत होते.

ठळक मुद्देग्रामीण भागातील वास्तविकता, डॉक्टरचा सल्ला घेण्याचे प्रमाण घटले

महेंद्र रामटेकेलाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : कोरोनाच्या  संसर्गबधितांची संख्या जिल्हाभरात वाढतच आहे.  तालुकास्तरावरील शासकीय रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबधितांवर उपचार सुरू असल्याने ग्रामीण भागातील शुगर (मधुमेह), बीपीचा (रक्तदाब) त्रास असणाऱ्या,  तसेच इतर  आजारांच्या अनेक रुग्णांच्या नियमित तपासणी आणि उपचारातही खंड पडत आहे. रुग्णालयात गेलो तर आपल्यालाही कोरोनाची लागण तर होणार नाही ना, या भीतीने ग्रासलेले असे शेकडो रुग्ण डॉक्टरांचा सल्ला घेण्यासही घाबरत आहेत.एरव्ही नियमित तपासणीला जात असले तरी सध्या कोरोनाच्या भीतीने ते  घरीच पडून राहतात. आरमोरी तालुक्यासह जिल्हाभरात ही स्थिती असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सर्वांत जास्त रुग्ण हे शुगर, बीपी व इतर आजारांचे आहेत. ५० वर्षांवरील व्यक्तींमध्ये  हे आजार सर्रास दिसतात. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील शुगर-बीपीने ग्रस्त रुग्ण तालुकास्तरावरील शासकीय रुग्णालयात जाऊन नियमित तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत होते. मात्र, आता  कोरोनाच्या भीतीमुळे लोक रुग्णालयात जाण्यासाठीच घाबरत आहेत. डिसेंबरअखेरपर्यंत कोरोनाची पहिली लाट ओसरली, त्यामुळे कोरोना गेला असे वाटत असताना पुन्हा पहिल्या लाटेपेक्षाही प्रभावी अशी दुसरी लाट आली. या लाटेने शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात पाय पसरले आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून बाधितांची संख्याही वाढत आहे. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. त्यामुळे लोकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरी भागातील काही रुग्ण खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील गरीब रुग्ण दवाखान्यात न जाता त्रास सहन करत घरीच पडून आहेत. कोरोनाच्या घातक परिस्थितीत शुगर, बीपी रुग्णाच्या नियमित तपासणी व उपचारात खंड पडणे त्यांच्या प्रकृतीसाठी घातक ठरू शकते. 

रुग्णांमध्ये गैरसमजच जास्तकोरोनाबधितांची संख्या वाढत असल्याने तालुकास्तरावरही शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोणत्याही खासगी रुग्णालयाला कोरोनाग्रस्त रुग्णाच्या उपचाराची परवानगी अद्याप नसली तरी कोरोनाची लक्षणे असलेले अनेकजण खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शुगर, बीपीचा त्रास असलेले व अन्य आजारांचे रुग्ण  दवाखान्यात कोरोनाचे रुग्ण  आहेत म्हणून शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातही जायला घाबरत आहेत. 

रुग्णालयात जायचे कशाने?रुग्णालयात गेल्यावर डॉक्टर कोरोनाची टेस्ट करायला लावतात, रुग्णाला हातही लावत नाही, अशी भीती आणि गैरसमज अनेकांमध्ये आहे. त्यातच एस. टी. बससेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील रुग्णाला रुग्णालयात  जायला साधन नाही. त्यामुळे रुग्णालयात जायचे तरी कशाने, हाही प्रश्न अनेकांसमोर आहे.

 

टॅग्स :doctorडॉक्टरcorona virusकोरोना वायरस बातम्या