शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत येणार लोकजागर यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 00:04 IST

लोकजागर अभियानातर्फे संपूर्ण विदर्भात लोकजागर यात्रा काढण्यात येणार असून २७ नोव्हेंबर रोजी ही यात्रा गडचिरोलीत पोहोचणार आहे. या यात्रेत ओबीसी प्रवर्गातील सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकजागर अभियानाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी केले.

ठळक मुद्देबैठकीत नियोजनावर चर्चा : ज्ञानेश वाकुडकर यांची माहिती, नागपुरातून होणार जनजागृतीचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकजागर अभियानातर्फे संपूर्ण विदर्भात लोकजागर यात्रा काढण्यात येणार असून २७ नोव्हेंबर रोजी ही यात्रा गडचिरोलीत पोहोचणार आहे. या यात्रेत ओबीसी प्रवर्गातील सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकजागर अभियानाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी केले.शनिवारी येथील विश्रामगृहात लोकजागर अभियानाबाबत सभा आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सभेच्या अध्यक्षस्थानी अरूण मुनघाटे होते. शाल्ोिकराम विधाते, देवराव म्हशाखेत्री, देवाजी सोनटक्के, नगरसेवक सतीश विधाते, पंडीतराव पुडके, प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, अ‍ॅड. संजय ठाकरे, देवानंद कामडी, राजेश चन्नावार, रमेश भुरसे, दादाजी चुधरी, पुरूषोत्तम ठाकरे, देवराव म्हशाखेत्री, गोपीनाथ चांदेवार, सुरेश भांडेकर, दत्तात्रय खरवडे, देवाजी सोनटक्के, दत्तात्रय बर्लावार, पांडुरंग घोटेकर, गोविंदराव बानबले, प्रा. शेषराव येलेकर, प्राचार्य खुशाल वाघरे आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. ज्ञानेश वाकुडकर म्हणाले, ५२ टक्के ओबीसी असलेल्या महाराष्टÑाचा आजपर्यंत एकही ओबीसी मुख्यमंत्री झाला नाही. ओबीसी समाजाला आरक्षणाच्या बाबतही असाच पक्षपात सहन करावा लागत आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसींना केवळ १६ टक्के आरक्षण मिळत आहे. नोकऱ्यांमध्येही ओबीसींचा मोठा बॅकलॉग आहे. ओबीसींवरील हा अन्याय दूर करण्यासाठी ओबीसी मुख्यमंत्री होऊन बहुजनांचे सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने लोकजागर यात्रेतून जनजागृती सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. २४ नोव्हेंबरपासून नागपूर येथून विदर्भव्यापी लोकजागर यात्रेचा शुभारंभ होत असून ५ डिसेंबरला वर्धा येथे या यात्रेचा समारोप होणार आहे, असे वाकुडकर यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी ओबीसी समाजाच्या आगामी रणनितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.