शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहसंचालकाची मॅट रोपवाटिकेस भेट

By admin | Updated: May 27, 2014 00:49 IST

सन २०१४-१५ या चालु वर्षात मानव विकास विकास योजनेंतर्गत जिल्हा परिषद कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने गडचिरोली तालुक्यात

पाच गावांत मॅट प्रकल्प : शेतकर्‍यांशी संवाद साधून अडचणी जाणल्या

गडचिरोली : सन २०१४-१५ या चालु वर्षात मानव विकास विकास योजनेंतर्गत जिल्हा परिषद कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने गडचिरोली तालुक्यात पाच गावामध्ये यांत्रिकी पद्धतीने भात लागवडीचे प्रकल्प घेण्यात आले. पारडी येथील बळीराजा बहुउद्देशिय संस्थेचे उपाध्यक्ष वसंत नागोस यांच्या शेतावर एक एकर क्षेत्राकरिता मॅट नर्सरी स्थापन करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या मॅट रोपवाटिकेस आज नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक डॉ. व्ही. सी. कुडमुलवार, जि. प. चे कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर, आत्माचे प्रकल्प संचालक अनंत पोटे यांनी मॅट रोपवाटीका तयार करणे, बियाण्यांची लागवड, पाणी, खते व किडीचे व्यवस्थापन आदीबाबत शेतकर्‍यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. तसेच या सर्व अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. आत्मा व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या खरीप हंगामात गडचिरोली तालुक्यातील पारडी, आंबेशिवणी, चांदाळा, मारकबोडी, मारदा या पाच गावात मॅट नर्सरी स्थापना करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गावातील शेतकर्‍यांच्या नोंदणीकृत गटांची निवड करून ९० टक्के अनुदानावर भात लागवड यंत्र, भात कापणी यंत्र, कोणोविडर, युरिया ब्रिकेट्स अप्लीकेटर्स व पॉवरटिलर आदी यंत्र वितरित करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. याप्रसंगी गडचिरोलीचे उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. बी. महंत, कृषी विस्तार अधिकारी दि. मा. जंगले, आत्माचे जी. एच. जांभुळकर, कृषी पर्यवेक्षक एन. जी. बडवाईक, कृषी सहाय्यक एस. पी. पोटे, गटाचे अध्यक्ष मुकुंदा निकुरे, नेताजी लोंढे आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी धान रोवणी यंत्राचीही पाहणी केली. कृषी विभागाच्यावतीने ९० टक्के अनुदानावर कृषी यंत्र वितरित होत असल्याने जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)