शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

समुदाय आरोग्य अधिकाऱ्याकडून होताहे करारनाम्याचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST

सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मुख्यालयी राहून आरोग्य सेवा देण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याशी सदर डॉक्टरांनी करारनामा केला आहे. या करारनाम्यातील नमूद वेळेत सदर डॉक्टर मुख्यालयी दांडी मारून खासगी व्यवसायात व्यस्त राहत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमुख्यालयाला दांडी । ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवेवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमाअंतर्गत देसाईगंज तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रस्तरावर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या आरोग्य अधिकाऱ्याकडून गेल्या अनेक महिन्यांपासून करारनाम्याचा उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मुख्यालयी राहून आरोग्य सेवा देण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याशी सदर डॉक्टरांनी करारनामा केला आहे. या करारनाम्यातील नमूद वेळेत सदर डॉक्टर मुख्यालयी दांडी मारून खासगी व्यवसायात व्यस्त राहत असल्याचे दिसून येत आहे.

आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमाअंतर्गत सद्य:स्थितीत राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये १ हजार २४३ उपकेंद्रस्तरावर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सन २०२२ पर्यंत परिपूर्ण आरोग्यसेवा जनतेला उपकेंद्रस्तरावर देण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक ही आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक मुंबई यांच्या २८ मार्च २०२० च्या आदेशान्वये करण्यात आली आहे. त्यानुसार देसाईगंज तालुक्यात १० समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहे.कोविड-१९ साथरोग परिस्थितीच्या धर्तीवर उपकेंद्रस्तरावर मनुष्यबळाची कमतरता लक्षात लक्षात घेता समुदाय आरोग्य अधिकाºयांची नियुक्ती आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात करण्यात आली. तालुक्यातील शंकरपूर, शिवराजपूर, कोकडी, तुळशी, बोडधा, विसोरा, आमगाव, कोंढाळा, पोटेगाव व किन्हाळा या १० आरोग्य उपकेंद्रात १० समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. उपकेंद्रात अनेक रुग्ण उपचारासाठी येतात.करारनाम्यात १६ अटी, शर्तींचा समावेशजिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जि.प.गडचिरोलीच्या वतीने समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश देताना १६ अटी व शर्ती असलेला करारनामा लिहून देण्यात आला आहे. यामध्ये ७ क्रमांकाच्या अटीनुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत नियुक्ती ठिकाणी आरोग्य सेवा देण्याचा उल्लेख आहे.तालुक्यातील समुदाय आरोग्य अधिकारी मुख्यालयी राहत नसतील तर चौकशी केली जाईल. चौकशीदरम्यान मुख्यालयी न राहत असल्याचे आढळून आल्यास संबंधित समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.- डॉ.अभिषेक कुमरे,तालुका आरोग्य अधिकारी, देसाईगंज

टॅग्स :doctorडॉक्टर