शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पेसा, नॉनपेसाबाबत गावांचे पुनसर्वेक्षण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 23:14 IST

५ मार्च २०१५ च्या शासन निर्णयानुसार राज्यपालांच्या अधिसूचनेअन्वये अनुसूचित क्षेत्रातील निश्चित केलेल्या १२ संवर्गातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांमधून भरले जात आहे. या अधिसूचनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील बिगर आदिवासी गावातील युवकांवर अन्याय झाल्याची बाब आपण शासनस्तरावर मांडली होती. त्यानंतर राज्य शासनाने २७ आॅगस्ट २०१८ रोजी नवा जीआर काढून सदर पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची बाब स्पष्ट केली.

ठळक मुद्देखासदारांची माहिती : २०० नॉनपेसा गावांत ओबीसी आरक्षण १९ टक्क्यांवर आल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ५ मार्च २०१५ च्या शासन निर्णयानुसार राज्यपालांच्या अधिसूचनेअन्वये अनुसूचित क्षेत्रातील निश्चित केलेल्या १२ संवर्गातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांमधून भरले जात आहे. या अधिसूचनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील बिगर आदिवासी गावातील युवकांवर अन्याय झाल्याची बाब आपण शासनस्तरावर मांडली होती. त्यानंतर राज्य शासनाने २७ आॅगस्ट २०१८ रोजी नवा जीआर काढून सदर पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची बाब स्पष्ट केली. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीमार्फत आता गडचिरोली जिल्ह्यातील गावांचे पेसा व नॉनपेसा संदर्भात पुनसर्वेक्षण होणार आहे. यातून नॉनपेसा क्षेत्रातील गावांची संख्या वाढणार असून ओबीसी व बिगर आदिवासी नागरिकांना न्याय मिळेल, असे संकेत भाजपचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते यांनी येथे पत्रकार परिषदेत दिले.यावेळी भाजपचे पदाधिकारी बाबुराव कोहळे, नगरसेवक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, रमेश भुरसे, डॉ.भारत खटी, न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, डी. के. मेश्राम, रवीकिरण समर्थ, प्रशांत भृगुवार, अनिल पोहणकर आदी उपस्थित होते. ओबीसींचे आरक्षण १९ टक्यांवरून सहा टक्के करण्यात आल्याने जिल्ह्यातील ओबीसी समाजावर अन्याय झाला. त्यामुळे आरक्षणावरील या अन्यायाच्या प्रश्नासंदर्भात आपण केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. चार ते पाच वेळा राज्यपालांशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पेसा कायदा हा केंद्र शासनाचा जुना कायदा आहे. या कायद्याला आमचा विरोध नाही. मात्र या कायद्यांतर्गत राज्यपालांनी काढलेल्या १२ पदांच्या भरती प्रक्रियेला आमचा विरोध आहे, असे खा. नेते यावेळी म्हणाले.शासन व प्रशासनाच्या माहितीनुसार सद्य:स्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील ८० टक्के गावे पेसा क्षेत्रात तर २० टक्के गावे बिगर आदिवासी क्षेत्रात समाविष्ट आहेत.ज्या ठिकाणी ओबीसींची लोकसंख्या अधिक आहे, अशीही गावे पेसा क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे बिगर आदिवासी नागरिकांवर अन्याय झाला आहे. सदर अन्याय दूर करण्यासाठी राज्य शासनाने २७ आॅगस्ट २०१८ रोजी जीआर काढून पेसा क्षेत्रातील पदभरती निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी समिती गठीत केली आहे. ज्या गावांमध्ये ओबीसी अथवा बिगर आदिवासींची लोकसंख्या ५० टक्केवर आहे, त्या ठिकाणी ओबीसींना २४ टक्के आरक्षण नोकर भरतीत मिळणार आहे.ज्या गावांमध्ये आदिवासींची लोकसंख्या ५० टक्क्यांवर आहे, ती गावे पेसा क्षेत्रात समाविष्ट करून पेसा कायद्याच्या नियमानुसार त्या ठिकाणची भरती प्रक्रिया होणार आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल तीन महिन्यात शासनाकडे सादर होणार आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील पेसा व नॉनपेसा क्षेत्रातील गावांची संख्या तंतोतंत निश्चित होणार आहे, असे खा. नेते म्हणाले.राष्ट्रीय महामार्गाचे पुन्हा भूमिपूजनगडचिरोली येथे दीड वर्षापूर्वी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साकोली-वडसा-आरमोरी-गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-सिरोंचा व चंद्रपूर-मूल-गडचिरोली-धानोरा-राजनांदगाव या राष्टÑीय महामार्ग कामाचे भूमिपूजन झाले होते. दरम्यान यावेळी सिरोंचा येथील गोदावरी नदीच्या पुलाचे लोकार्पणही झाले होते. मात्र गडचिरोली-धानोरा या मार्गाचे काम अद्यापही सुरू झाले नाही. गडचिरोली-चामोर्शी-सिरोंचा याही मार्गाचे काम प्रतीक्षेत आहे. आता १४ सप्टेंबर रोजी या शहरातून जाणाऱ्या गडचिरोली-धानोरा आणि गडचिरोली-मूल या राष्टÑीय महामार्गाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी माहितीही खासदार अशोक नेते यांनी यावेळी दिली.