शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

मजुरांच्या मदतीसाठी सरसावले गावकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या शेतमजुरांचे चांगलेच हाल झाली. तेलंगणातील लोक त्यांना आपल्या गावात घेण्यास तयार नव्हते. त्यात प्रवासी वाहतूक बंद. अशावेळी पायीच गावाचा रस्ता पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. या मजुरांनी हिंमत ठेवत आपल्या गावातील लोकांशी आणि जिल्हा परिषद कृषी सभापती रमेश बारसागडे, सामाजिक कार्यकर्ते अरु ण कुनघाडकर यांच्याशी संपर्क ठेवला.

ठळक मुद्दे२५० किमीची पायपीट । तेलंगणातून येताच विलगीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : पोटाची खळगी भरण्यासाठी तालुक्यातील कुनघाडा (रै) येथील १२ शेतमजूर तेलंगणा राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातल्या निरदगोंडा गावात मजुरी करण्यास गेले होते. पण लॉकडाऊननंतर राज्यांच्या सीमा सिल होऊन मजुरीही बंद झाली. कमावलेला पैसाही खर्च झाला. अखेर त्यांनी तब्बल २५० किलोमीटरचे अंतर पायी पार करत आपले गाव गाठले. अनेक गावांमध्ये बाहेरून आलेल्या व्यक्तीला प्रवेश नाकारला जात असताना या गावकऱ्यांनी मात्र त्यांना सर्वतोपरी मदत करून त्यांचे गावातच विलगीकरणही केले.लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर या शेतमजुरांचे चांगलेच हाल झाली. तेलंगणातील लोक त्यांना आपल्या गावात घेण्यास तयार नव्हते. त्यात प्रवासी वाहतूक बंद. अशावेळी पायीच गावाचा रस्ता पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. या मजुरांनी हिंमत ठेवत आपल्या गावातील लोकांशी आणि जिल्हा परिषद कृषी सभापती रमेश बारसागडे, सामाजिक कार्यकर्ते अरु ण कुनघाडकर यांच्याशी संपर्क ठेवला. त्यांनी त्यांना हिंमत देत तेथील सरकारकडून काही मदतही करण्याचा प्रयत्न केला. मात्र गावात परत आल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.अखेर मजल-दरमजल करत सकाळी हे मजूर महाराष्टÑाच्या वेशीवर आले. अरु ण कुनघाडकर यांनी त्यांना कुनघाडापर्यंत आणण्यासाठी आमदार डॉ.देवराव होळी यांच्याशी संपर्क केला. डॉ.होळी यांनी लगेच त्या मजुरांसाठी अ‍ॅम्बलन्स पाठवून त्यांना गावापर्यंत नेऊन सोडण्याची आणि गावातच सुरक्षित विलगीकरण करण्याची सूचना केली. तहसीलदार संजय गंगथळे, नायब तहसीलदार तंगुलवार व तालुका आरोग्य अधिकारी यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी सर्वाची कुनघाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून आवश्यक औषधोपचारही केला. सर्वांचे सुरक्षित विलगीकरण करण्यात आले. यावेळी कुनघाडाचे सरपंच अविनाश चलाख, पोलीस पाटील दिलीप शृंगारपवार यांच्यासह गावकऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले.एकीकडे अनेक गावात सध्या बाहेरून आलेल्या नागरिकांकडे शंकेने पाहून त्यांना गावात प्रवेशही दिला जात नाही. परंतु कुनघाडा येथील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व गावकºयांनी त्या १२ मजुरांना मानविय दृष्टिकोनातून मदत करून त्यांच्या आरोग्यासाठी सुरक्षित विलगीकरण केले. त्यांची ही माणुसकी इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

टॅग्स :Labourकामगार