शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी ग्रा.पं.ला ठोकले कुलूप

By admin | Updated: April 19, 2017 02:07 IST

जिल्ह्यात वाढत्या उष्णतामानाबरोबरच पाणीटंचाईचे संकट अतिशय गंभीर स्वरूप धारण करीत आहे.

२२ लाख खर्चूनही समस्या कायमच : चोप येथे अत्यल्प पाणी पुरवठ्याने महिला व नागरिक संतप्त गडचिरोली : जिल्ह्यात वाढत्या उष्णतामानाबरोबरच पाणीटंचाईचे संकट अतिशय गंभीर स्वरूप धारण करीत आहे. अनेक गावांत विहिरी कोरडया पडल्या आहेत. हातपंप बंद पडल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. तर सोमवारी रात्री देसाईगंज तालुक्याच्या चोप येथे नळ योजनेतून पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याची घटना घडली. कोरेगाव/चोप : देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत चोप ग्रामपंचातीत सन २००७-०८ या वर्षात २२ लाख रूपये खर्चून जलस्वराज्य योजनेतून पाणी टाकीचे बांधकाम करण्यात आले. त्यावेळी मर्यादित लोकसंख्या असल्यामुळे तात्पुरती गरज भासली. परंतु आता नळ कनेक्शनची संख्या वाढली असून वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणीही प्रत्येक घरात होऊ लागली आहे. त्यामुळे जुन्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी कमी पडत आहे. त्यामुळे चोप गावात पाणी टंचाईची समस्या भिषण झाली आहे. नागरिकांना दोन घागरी पाणी मिळणेही कठीण झाल्याने संप्तत झालेल्या ग्रामस्थांनी चोप ग्रामपंचायतीवर मोर्चा नेऊन सोमवारी रात्री ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकल्याची घटना घडली आहे. चोप गावची लोकसंख्या ३ हजार २३३ असून लोकसंख्येवर आधारित १ लाख ३० हजार लिटर क्षमतेची पाणी टाकी गावात आहे. पण ग्रामपंचायत कार्यालयाच्या नियोजन शुन्यतेमुळे चोप गावात काही भागात ७० टक्के तर काही भागात ३० टक्के पाण्याची विभागणी झाली आहे. गावात मोठ्या प्रमाणावर बोअरवेल बंद झाले असून गावातील विहिरीच्या पाण्याची पातळी सुध्दा आटलेली आहे. त्यामुळे चोपमध्ये पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. महिलांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संप्तत झालेल्या नागरिकांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. जोपर्यंत पाणी पुरवठा व्यवस्थित सुरू होणार नाही, तोपर्यंत ग्रामपंचायतीचे कुलूप उघडणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकारी, सरपंच व ग्रामसेवकांना निवेदनातून दिला आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे, गावापासून दीड किमी अंतरावर गाढवी नदी वाहते. तरीही या गावात पाणी समस्येचे संकट ओढावले आहे. नागरिकांना नळाचे पाणी मिळण्यास चोप येथे मोठी अडचण होत आहे. (वार्ताहर)