शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

विहीरगाव जंगलाला आग

By admin | Updated: March 29, 2017 02:28 IST

देसाईगंज वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या विहीरगाव येथील एफडीसीएमच्या ८० क्रमांकाच्या कम्पार्टमेंटमध्ये

वन विभागाचे दुर्लक्ष : ऊन वाढताच आगी लागण्याचे प्रमाण वाढले जोगीसाखरा : देसाईगंज वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या विहीरगाव येथील एफडीसीएमच्या ८० क्रमांकाच्या कम्पार्टमेंटमध्ये सोमवारी सकाळच्या सुमारास आग लागली. या आगीत लाखो रूपयांची वनसंपदा जळून खाक झाली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच क्षेत्र सहायक पवार हे वनवा लागलेल्या ठिकाणी कार घेऊन आले. मात्र आग विझविण्यासाठी त्यांनी कोणतेच प्रयत्न केले नाही. यावरून एफडीसीएम आगीबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. जंगलाला आग लागल्यानंतर लाखो रूपयांची वनसंपदा नष्ट होते. वनवा लागू नये किंवा वनवा लागल्यानंतर तो तत्काळ विझविता यावा, यासाठी राज्य शासनाने वन विभागाला कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सदर निधी वन विभागाच्या स्थानिक कार्यालयांना उपलब्ध करून दिला जातो. मात्र आग न लागण्यासाठी करावयाच्या उपाययोजना केवळ कागदोपत्रीच केल्या जातात व त्यापासून मिळणारे लाखो रूपये वन कर्मचारी आपल्या खिशात टाकत आहेत. या गंभीर प्रकाराकडे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. एप्रिल महिन्यामध्ये आगी लागण्याच्या घटना वाढत असल्याने विशेष उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर) आलापल्ली नजीक वणवा आलापल्लीपासून अवघ्या तीन किमी अंतरावरील आलापल्ली-एटापल्ली मार्गावरील जंगल परिसराला आग लागली. या आगीत लाखो रूपयांची वनसंपदा नष्ट झाली. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास लागलेल्या वणव्याने उग्ररूप धारण केले होते. मात्र आगविझविण्यासाठी वन विभागाचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. आलापल्ली येथे वन विभागाचे शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. तरीही आगीकडे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.