शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

विहिरगाव व कोरचीत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

By admin | Updated: September 3, 2014 23:24 IST

देसाईगंज तालुक्यातील विहिरगाव व कोरची येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ ३ सप्टेंबर रोजी करण्यात आला.

विसोरा/ कोरची : देसाईगंज तालुक्यातील विहिरगाव व कोरची येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ ३ सप्टेंबर रोजी करण्यात आला. देसाईगंज तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा विहिरगाव येथील युवक विद्यालयात आयोेजित करण्यात आली आहे. स्पर्धेेचे उद्घाटन संस्था सचिव अब्दुल गणी यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एन. के. वैद्य तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका गुरनुले, प्रा. कहूरके, जी. के. पिल्लारे, रमाकांत ठेंगरी, आर. डी. हरणे, एस. आर. दिवटे आदी मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा ६ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. स्पर्धेत १४ वर्ष, १७ वर्र्ष व १९ वर्ष वयोगटातील कबड्डी, खो- खो, व्हॉलिबॉल तसेच इतर वैयक्तिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तालुका क्रीडा समितीच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा समितीचे उपाध्यक्ष एन. एल. मेश्राम, संचालन पुस्तोडे तर आभार गुरफुले यांनी मानले. स्पर्धेत देसाईगंज तालुक्यातील १८ शाळांमधील संघांनी सहभाग घेतला आहे. यशस्वीतेसाठी शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी व नागरिकांनी सहकार्य केले. याप्रसंगी सेवानिवृत्ती शिक्षक एस. आर. दिवटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. कोरची येथील श्रीराम विद्यालयाच्या क्रीडांगणावर तालुकास्तरीय क्रीडा समिती कोरचीच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ बुधवारी तहसीलदार बोरूले यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य गजभिये, नायब तहसीलदार खंडारे, नायब तहसीलदार हटवार, पित्तूलवार, आनंद चौबे आदी मान्यवर उपस्थित होते. तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत श्रीराम विद्यालय कोरची, पार्वताबाई विद्यालय कोरची, वनश्री विद्यालय कोरची, धनंजय स्मृती विद्यालय बेतकाटी, धनंजय स्मृती विद्यालय देऊळभट्टी, भगवंतराव विद्यालय बोटेकसा, भगवंतराव विद्यालय बोरी, छत्रपती विद्यालय मसेली, अरूणा विद्यालय कोटरा, पितृछाया विद्यालय बोटेकसा, जिल्हा परिषद हायस्कूल बेडगाव, युवा स्पंदन विद्यालय भीमपूर, महात्मा फुले विद्यालय बेलगाव या शाळांच्या संघांनी सहभाग घेतला आहे. प्रास्ताविक क्रीडा सचिव हटवार यांनी मानले. पंच म्हणून करंजकर, गायधने, बावणे, डोंगरवार, बोरकर, कराडे काम पाहत आहेत. विजेत्या संघाचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या स्पर्धेत विजयी झालेल्या संघांना पुढील स्पर्धेत तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)