शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

शिवसेनेकडून विदर्भात सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 13:34 IST

पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी सुरू झाली आहे. भाजपशी निवडणूकपूर्व युती होणार नाही हे गृहित धरून सेनेकडून सर्व मतदार संघांमध्ये संभावित उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्वतंत्रपणे लढण्याची तयारी रावते करणार वातावरण निर्मिती

मनोज ताजने लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी सुरू झाली आहे. भाजपशी निवडणूकपूर्व युती होणार नाही हे गृहित धरून सेनेकडून सर्व मतदार संघांमध्ये संभावित उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. काही ठिकाणी विदर्भ संपर्क प्रमुख तथा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यामार्फत सर्व दृष्टीने ‘सक्षम’ ठरणाऱ्या संभावित उमेदवारांचे ‘मातोश्री’वर हजेरी लावणेही सुरू झाले आहे.विदर्भातील काही मतदार संघ नेहमीसाठी विशिष्ट प्रवर्गासाठी राखीव आहेत. काही ठिकाणी त्या प्रवर्गातील योग्य उमेदवार पक्षाकडे नसल्याने सक्षम उमेदवारांचा शोध घेऊन त्याच्या गळ्यात शिवसेनेकडून उमेदवारीची माळ घातली जाणार आहे. मतदार संघात जनसंपर्क ठेवण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर न करता त्यांना कामी लागण्याची सूचना दिली जात आहे.२०१४ च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लोकसभा व विधानसभा निवडणूक लढल्यानंतरही विदर्भात सेनेला लोकसभेच्या ४ आणि विधानसभेच्या ४ जागांवर यश मिळाले होते. त्यापैकी भावना गवळी (वाशिम), आनंदराव अडसूळ (अमरावती) आणि प्रतापराव जाधव (बुलडाणा) हे तीन खासदार, तसेच संजय राठोड (दारव्हा), डॉ.संजय रायमुयलकर (मेहकर) आणि डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेडराजा) हे तीन आमदार पश्चिम विदर्भातील आहेत. त्या तुलनेत पूर्व विदर्भात लोकसभेवर कृपाल तुमाने (रामटेक) आणि विधानसभेवर सुरेश (बाळू) धानोरकर (वरोरा) हे दोघेच निवडून गेले होते. पश्चिम विदर्भाचे संपर्क प्रमुख म्हणून दिवाकर रावते अनेक वर्षांपासून काम पाहात आहेत. या भागात सेनेला मिळालेले यश हे रावतेंच्या मार्गदर्शनातूनच मिळाल्याचे मानून आता पूर्व विदर्भाचीही जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पूर्व विदर्भातील जिल्ह्यात शिवसेनेच्या पक्षबांधणीत काही बदल होऊन निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना हटविले जाण्याची शक्यता आहे.पश्चिम विदर्भात दिवाकर रावते यांनी गेल्या १५ वर्षात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक मोर्चे, आंदोलने करून जनमानसाला सेनेशी जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पूर्व विदर्भातही शेतकऱ्यांसोबतच ओबीसींच्या प्रश्नांवर पदाधिकाऱ्यांना आक्रमक होण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. मात्र या आंदोलनांमध्ये पाहीजे तसा जीवंतपणा कमी आणि दिखाऊपणाच अधिक असल्याने पूर्व विदर्भ काबिज करण्याचे सेनेचे प्रयत्न कितपत यशस्वी होईल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना