शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात मतदानाचा उत्साह

By admin | Updated: February 16, 2017 13:54 IST

ऑनलाइन लोकमत गडचिरोली, दि. 16 -  नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या आठ तालुक्यात ३५ जिल्हा परिषद क्षेत्र व ७० पंचायत समिती ...

ऑनलाइन लोकमत

गडचिरोली, दि. 16 -  नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या आठ तालुक्यात ३५ जिल्हा परिषद क्षेत्र व ७० पंचायत समिती गणात गुरूवारी सकाळी ९.३० वाजेपर्यंत १२.२३ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. अतिशय संवेदनशील भाग असलेल्या कोरची तालुक्यात दोन जिल्हा परिषद व चार पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान होत आहे. अतिशय कडक सुरक्षा व्यवस्थेत येथे सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे. 
 
देसाईगंज तालुक्यात सकाळी ९.३० वाजेपर्यंत १४.७१ टक्के मतदान झाले. तर कुरखेडा तालुक्याच्या पुराडा व हेटीनगर भागात २५ टक्के मतदान झाले आहे. मुलचेरा तालुक्यात तिन्ही जिल्हा परिषद क्षेत्र मिळून ९.३० वाजेपर्यंत १०.३५ टक्के मतदान झाले आहे. धानोरा तालुक्यात ११.७० टक्के, गडचिरोली तालुक्यात १३.४६ टक्के, आरमोरी तालुक्यात १२ टक्के तर कोरची तालुक्यात १६.४३ टक्के मतदान सकाळी ९.३० वाजेपर्यंत झाले आहे. कोरची, धानोरा, कुरखेडा आदी संवेदनशील तालुक्यात मोठा पोलीस बंदोबस्त मतदान केंद्रांवर लावण्यात आला आहे. 
 
गडचिरोली जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदान होणार आहे. कुरखेडा तालुक्याच्या दवंडी मतदान केंद्रांवर अनेक मतदार एकच मतदान करून बाहेर निघत होते. त्यानंतर त्यांना पुन्हा परत बोलावून दुसरे मत टाकण्यास सांगण्यात आले. ब-याच मतदारांना जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी दोनदा मतदान करायचे आहे, याची माहिती नसल्याने हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
गडचिरोली तालुक्यात नवेगाव येथील मतदान केंद्र अधिका-यांकडे असलेल्या यादीमध्ये अनेक मतदारांची नावेच नव्हती. त्यामुळे मतदारांना मतदान करण्यास मज्जाव करण्यात आला. याबाबतची माहिती तहसीलदार संतोष खांडरे यांना सुद्धा देण्यात आली. मतदार यादीत स्वत:चे नाव व क्रमांक शोधण्यासाठी मतदारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. 
गडचिरोली
9.30 ते 11.30 पर्यंतच्या  दोन तासात झालेल्या मतदानाची टक्केवारी 
देसाईगंज-  38.02 टक्के
मुलचेरा-   22.46 टक्के
कोरची-   36.71 टक्के
धानोरा-  37.31 टक्के
आरमोरी-   41.39 टक्के
कुरखेडा-   45.09 टक्के
गडचिरोली-  32.19 टक्के
चामोर्शी-   22.17 टक्के
 
 
आरमोली तालुका
 
आरमोरी तालुक्यातील अरसोडा मतदान केंद्रावर 100 शंभर वर्षाहून अधिक वय असलेल्या आजींनी मतदानाचा हक्क बजावला. 
 
 
 
https://www.dailymotion.com/video/x844r6s