गडचिरोली : वेगळा विदर्भ होणे हा वैदर्भिय जनतेच्या हक्काचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. या विषयावर नागपूर येथील जनमंच या सामाजिक राजकीय संघटनेने ‘लढा विदर्भाचा’ या विषयावर जनजागृती करण्याचे निश्चित केले आहे. याचा प्रचार आणि प्रसार विदर्भाच्या गावागावात सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्हा मुख्यालयात १२ जुलै २०१४ ला जनमंचाचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, सल्लागार प्रा. शरद पाटील, समन्वयक प्रा. चंद्रकांत वानखेडे, जनमंचाचे निमंत्रक प्रकाश इटनकर आदी मार्गदर्शन करणार आहेत. जनमंच संघटनेने विदर्भातील अनेक प्रश्नांवर जनहित याचिकेद्वारे आवाज उठवून सर्वसामान्यांना न्या मिळवून दिला आहे. स्थानिक शिवाजी महाविद्यालय धानोरा रोड गडचिरोली येथे दुपारी ४ वाजता सभा आयोजित करण्यात आली असून या सभेला गडचिरोली जिल्ह्यातील विदर्भवादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असा आवाहन अरूण पाटील मुनघाटे, अॅड. संजय ठाकरे, रोहिदास राऊत, नामदेवराव गडपल्लीवार, रमेश भुरसे, सुरेश पद्मशाली, पांडुरंग भांडेकर, प्रभाकर वासेकर, सुधाकर नाईक, विलास कोडाप, प्राचार्य ज्ञानेश्वर म्हशाखेत्री, राजेंद्रसिंह ठाकूर, प्रा. राजेश कात्रटवार, प्रा. शेषराव येलेकर, दादाजी चुधरी, पुरूषोत्तम म्हशाखेत्री, शरद ब्राम्हणवाडे, पांडुरंग घोटेकर, बाबुराव बावणे, समय्या पसुला, रमेश अप्पलवार, शाम वाढई, प्रशांत वाघरे, देविदास बारसिंगे, नामदेव मसराम, सतिश विधाते, समशेर पठाण, खुशाल वाघरे, योगेश गोहणे, आशुतोष कोरडे, रमेश चौधरी, सचिन बोबाटे आदींनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जनमंच करणार विदर्भाचा एल्गार
By admin | Updated: July 10, 2014 23:34 IST