शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या मुद्यावर न.प.च्या सर्व जागा लढविणार

By admin | Updated: July 26, 2016 01:17 IST

स्वतंत्र विदर्भाची चळवळ तीव्र करण्यासाठी विदर्भ माझा पक्षाने विदर्भातील सर्वच नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्रकार परिषद : राजकुमार तिरपुडे यांची माहिती गडचिरोली : स्वतंत्र विदर्भाची चळवळ तीव्र करण्यासाठी विदर्भ माझा पक्षाने विदर्भातील सर्वच नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गडचिरोली नगर परिषदेच्या सर्वच जागा या पक्षाच्या वतीने लढविल्या जातील, अशी माहिती पक्षाचे संस्थापक राजकुमार तिरपुडे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. साधन संपत्तीने श्रीमंत असलेल्या विदर्भाची मागणी जुनी आहे. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी अनेक आंदोलने व चळवळी झाल्या आहेत. मात्र राजकीय पक्षांनी स्वतंत्र विदर्भ आजपर्यंत दिलेला नाही. स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन करण्याबरोबरच सत्तेत सहभागी होऊन ही चळवळ आणखी तीव्र करण्यासाठी विदर्भ माझा पक्ष यावर्षी स्थापन झाला आहे. किमान ४०० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आणणाऱ्या व्यक्तीला विदर्भ माझा पक्षाची उमेदवारी दिली जाईल. उमेदवारांची चाचपणी येत्या आठ दिवसात केली जाईल. त्यामुळे उमेदवाराला पुरेसा वेळ मिळेल. विदर्भ माझा पक्षाच्या उमेदवाराने विदर्भाविषयची माहिती नागरिकांना सांगून मते मागायची आहेत. स्वतंत्र विदर्भ झाल्यास तो आर्थिकदृष्ट्या कसा सक्षम राहिल, हे सांख्यिकीदृष्ट्या मतदारांना पटवून द्यायचे आहे. विदर्भातील ९० टक्के जनता स्वतंत्र विदर्भाच्या बाजुने आहे. त्यामुळे विदर्भ माझा पक्षाला जनता निश्चितच मतदान करेल व विदर्भ माझा पक्षाचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून येतील. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील इतर नेते विदर्भाच्या मुद्यावर निवडणुका लढवून दाखविण्याचे आव्हान देतात. नगर परिषदांच्या निवडणुका जिंकून या नेत्यांना विदर्भाच्या मुद्यावर निवडणुका जिंकता येतात. हे दाखवून द्यायचे आहे, अशी माहिती राजकुमार तिरपुडे यांनी दिली. यावेळी विदर्भ माझा पक्षाचे सरचिटणीस मंगेश तेलंग, नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष नाना ठाकरे, प्रकाश ताकसांडे, मनोहर चलाख उपस्थित होते.(नगर प्रतिनिधी)