शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवाद्यांनी केली वीज बिलाची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:01 IST

विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने येथील वीज वितरण कार्यालयासमोर अवाजवी वीज बिलाची होळी केली. यावेळी समितीचे जिल्हा संयोजिक अरूण मुनघाटे, रमेश उप्पलवार, एजाज शेख आदीसह विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनानंतर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन पाठविण्यात आले.

ठळक मुद्देमहावितरणच्या कारभाराविरोधात नारेबाजी : वीज बिल निम्मे करून कृषीपंपाचे भारनियमन बंद करा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/कुरखेडा/घोट : विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे ९ ऑगस्ट रोजी रविवारला जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर अवाजवी वीज बिलाची होळी करून महावितरणच्या धोरणाविरोधात नारेबाजी करण्यात आली. दरम्यान विदर्भवाद्यांनी कोरोना लॉकडाऊनच्या काळातील सर्वांचे वीज बिल निम्मे करा, अशी मागणी केली.विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने येथील वीज वितरण कार्यालयासमोर अवाजवी वीज बिलाची होळी केली. यावेळी समितीचे जिल्हा संयोजिक अरूण मुनघाटे, रमेश उप्पलवार, एजाज शेख आदीसह विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनानंतर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन पाठविण्यात आले.कुरखेडा - विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा कुरखेडाच्या वतीने महावितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर अवाजवी वीज बिलाची होळी करण्यात आली. त्यानंतर महावितरणच्या उपअभियंत्यांमार्फत मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर, उपाध्यक्ष घिसू खुणे, मुक्ता दुर्गे, रामचंद्र रोकडे, ज्ञानदेव चहारे, हेमलता भैसारे, प्रजीत लाडे, ठाकूरराम कोसरे आदी उपस्थित होते.घोट - विदर्भ राज्य आंदोलन समिती शाखा घोटच्या वतीने येथील वीज वितरण कंपनीच्या ३३ केव्ही उपकेंद्र कार्यालयासमोर अवाजवी वीज बिलाविरोधात नारेबाजी करण्यात आली. वीज बिल माफ होईपर्यंत गाव तिथे वीज बिलाची होळी करण्याचा ठराव ग्रामसभेत पारित करणार, असा इशारा निवेदनातून सरकारला देण्यात आला. याप्रसंगी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, परशुराम दुधबावरे, बाबुराव भोवरे, गिरीश उपाध्ये, करण गण्यारपवार, हेमंत उपाध्ये यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.निवेदनातील मागण्याकोरोना काळातील संपूर्ण वीज बिल सरकारने स्वत: भरून जनतेला वीज बिलातून मुक्त करावे, कोरोना लॉकडाऊननंतर २० युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे तसेच त्यानंतरचे वीज दर निम्मे करावे. विदर्भाला वीज प्रकल्पाच्या प्रदूषणातून मुक्त करावे, कृषीपंपाचे १२ ते १६ तासाचे भारनियमन बंद करावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :electricityवीज