शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरू पालिकेचे स्वच्छतादूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:00 IST

गडचिरोली शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता नगर परिषदेमार्फत विविध उपक्रम व उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात आणखी भर म्हणून नगर परिषदेने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांची स्वच्छता सर्वेक्षण २०१८ करिता ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे.

ठळक मुद्देस्वच्छता सर्वेक्षणात भाग घेणार : गडचिरोली शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता नगर परिषदेमार्फत विविध उपक्रम व उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात आणखी भर म्हणून नगर परिषदेने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांची स्वच्छता सर्वेक्षण २०१८ करिता ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड केली आहे. २२ डिसेंबरला नगर पालिकेत पार पडलेल्या कार्यक्रमात कुलगुरू कल्याणकर यांचा नगराध्यक्ष योगिता पिपरे व मुख्याधिकारी कृष्णा निपाणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला न. प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, पाणीपुरवठा सभापती केशव निंबोड, शिक्षण सभापती नितीन उंदीरवाडे, महिला व बालकल्याण सभापती अल्का पोहणकर, नगरसेवक मुक्तेश्वर काटवे, सतीश विधाते, नीता उंदीरवाडे, अनिता विश्रोजवार, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे उपस्थित होते.नगर पालिकेच्या वतीने शहरातील अडीच हजार नागरिकांना शौचालय बांधण्याकरिता अनुदान देऊन शहर हागणदारीमुक्त करण्यात आले. तसेच शहर स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याकरिता प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी प्रास्ताविकेतून दिली.याप्रसंगी कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर म्हणाले, शहर स्वच्छ आणि सुंदर होण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, शहराला स्वच्छ करण्याकरिता शहरातील नागरिकांनीही एकत्र येऊन सहकार्य करणे गरजेचे आहे. नागरिकांनी स्वत:च्या घरापासून स्वच्छतेची सुरूवात करावी व स्वच्छतेची गुणवत्ता टिकवावी, असे आवाहन केले. याप्रसंगी नगराध्यक्षांनीही विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार गणेश ठाकरे यांनी मानले.स्वच्छता पाळणाºयांचा सत्कारगडचिरोली शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी प्रशासन स्तरावर विविध विभाग कार्य करीत आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालय व परिसरात स्वच्छता पाळल्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते तसेच शाळा व परिसरात स्वच्छता पाळल्याबद्दल जवाहरलाल नेहरू नगर परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर गोहणे यांना कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.