शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाची झाडाला धडक; एक ठार

By admin | Updated: June 3, 2016 01:14 IST

कुरखेडावरून गडचिरोलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर दुसरा गंभीर

वैरागडनजीकची घटना : एक गंभीर जखमीवैरागड : कुरखेडावरून गडचिरोलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने झाडाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना कढोली-वैरागड मार्गावर वैरागडपासून दोन किमी अंतरावर बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. रोशन रामटेके (३४) रा. गांधीनगर कुरखेडा असे ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. तर जाकीर शेख (२२) रा. पवनी जि. भंडारा हा गंभीर जखमी झाला आहे.एम एच-४०-केआर-२३९३ क्रमांकाचे चारचाकी वाहन कुरखेडावरून गडचिरोलीकडे जात होते. दरम्यान पाटणवाडानजीकच्या वळणावर या वाहनाने झाडाला जबर धडक दिली. यात रोशन रामटेके व जाकीर शेख गंभीर जखमी झाले. आवाजामुळे पाटणवाडातील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. या चारचाकी वाहनाचा समोरील भाग पूर्णत: क्षतीग्रस्त झाला. चालकाचे पाय दरवाजात अडकले होते. जमलेल्या लोकांनी आरीने वाहनाचा दरवाजा कापून वाहनचालक जाकीर शेख याला वाहनातून बाहेर काढले. रोशन रामटेके हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. याच वाहनातील तिसरा व्यक्ती कढोली मार्गाने पळून जात असताना लोकांनी त्याला पकडले. त्यानंतर पोलीस पाटील परशुराम कुमरे यांनी फोन करून घटनास्थळावर रुग्णवाहिका बोलाविली. दोन्ही जखमींना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रोशन रामटेके याचा मृत्यू झाला. या घटनेतील अपघातग्रस्त वाहन समोरून पूर्णत: क्षतीग्रस्त झाले. या घटनेसंदर्भात आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बिट जमादार देवराव सहारे करीत आहेत. (वार्ताहर)