शहरं
Join us  
Trending Stories
1
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
2
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
3
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
4
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
5
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
6
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
7
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
8
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
9
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
10
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
11
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
12
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
13
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
14
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
15
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
16
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
17
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
18
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
19
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
20
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश

भाजीबाजार सुसाट, नागरिक होताहेत बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 05:00 IST

दुकानदारांसह खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये बिनधास्तपणा आल्यामुळे कोरोना पुन्हा वाढण्यासाठी ते कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजी हा दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे; पण तरीही आठवडी भाजीबाजारात होणारी गर्दी पाहता प्रशासनाने बाजार भरविण्यास परवानगी दिलेली नाही. मात्र काही ठिकाणी गर्दीसह बाजार भरत आहे.

ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सिंगचा अभाव, अनेकांच्या नाकावरील मास्कही गायब

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लॉकडाऊनमध्ये ४ वाजेपर्यंत शिथिलता मिळाली. मात्र, आठवडी बाजार भरविण्यास अद्याप बंदी कायम आहे. असे असले तरी काही ठिकाणी जागा बदलून भाज्यांची दुकाने लागतच आहेत. अनेक ठिकाणी आठवडी नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी दैनंदिन भाजीबाजार भरत आहे. हे करताना दुकानदारांसह खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांमध्ये बिनधास्तपणा आल्यामुळे कोरोना पुन्हा वाढण्यासाठी ते कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजी हा दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे; पण तरीही आठवडी भाजीबाजारात होणारी गर्दी पाहता प्रशासनाने बाजार भरविण्यास परवानगी दिलेली नाही. मात्र काही ठिकाणी गर्दीसह बाजार भरत आहे.

चामोर्शीत गर्दीचा उच्चांकयेथील भाजी बाजारात पाय ठेवायलाही जागा नसते एवढी गर्दी होत आहे. दुपारपर्यंत माल खराब होतो. दुकानांच्या आजूबाजूला कचऱ्याचे साम्राज्य असते; पण त्या अस्वच्छतेतही भाजीबाजारात लोक गर्दी करत आहेत. नगर पंचायतने या गर्दीवर नियंत्रण ठेवून भाजी बाजारातील स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.

एटापल्लीत झुंबडआठवडी बाजाराला परवानगी नसल्याने मंगळवारी नियोजित जागेवर बाजार भरत नाही; पण इतरत्र दुकाने लागत आहेत. एटापल्ली-गट्टा मार्गावर लॉकडाऊनच्या काळातही बाजार भरायचा; पण त्यावेळी गर्दी कमी असायची. आता मात्र तेंदूपत्त्याचा पैसा हाती असल्याने बाजारात गर्दी असते. यात कोरोना नियमांचा फज्जा उडताे.

आरमोरीत नियंत्रणयेथे शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार सध्या बंद आहे. मात्र, दैनंदिन गुजरी भरते. नगर परिषदेसमोरच हा बाजार भरतो. त्यामुळे गर्दी आणि कोरोनाचे नियम पाळण्यावर बऱ्यापैकी नियंत्रण आहे. त्यात विशिष्ट अंतर ठेवून दुकाने लावण्याच्या बाबतीत मात्र नियमांचे पुरेपूर पालन होत नसल्याचे दिसून येते.

देसाईगंजमध्ये चार ठिकाणी विक्रीबाजारात एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नगर परिषदेने चार ठिकाणी भाजीबाजार भरविण्यासाठी जागा दिली. टी-पॉइंट, भगतसिंग वाॅर्ड, कुथे कॉन्व्हेंटसमोरील आणि आयटीआयसमोरील जागेत भाजीबाजार भरत आहे. परिणामी, फारसी गर्दी होताना दिसत नाही. 

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आठवडी बाजाराला परवानगी देण्यात आलेली नाही; पण नियमांचे पालन करून वेगवेगळ्या ठिकाणी भाजी विक्री झाली तर त्यात वावगे काही नाही. हे करताना खरेदीसाठी गर्दी बिलकूल होऊ नये. मास्कचा वापरही अत्यावश्यक आहे. याचे पालन होत नसेल तर स्थानिक प्रशासनाकडून कारवाई होईल.- कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार