शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला कडाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:29 IST

सध्या लग्न समारंभाचे दिवस आहेत. या कालावधीत पालेभाज्या व फळभाज्यांची मागणी वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागातून भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. मागणी व पुरवठ्यामध्ये बराच अंतर पडल्याने भाजीपाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

ठळक मुद्देसर्वसामान्यांचे बजेट कोलमडले : वाढत्या तापमानाने आवक कमी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सध्या लग्न समारंभाचे दिवस आहेत. या कालावधीत पालेभाज्या व फळभाज्यांची मागणी वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागातून भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. मागणी व पुरवठ्यामध्ये बराच अंतर पडल्याने भाजीपाल्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.गडचिरोली येथील १२ मे रोजी रविवार भरलेल्या आठवडी बाजारात अनेक प्रकारच्या भाज्यांचे दर वाढल्याचे दिसून आले. जिल्हा मुख्यालयातील बाजारपेठेत दर रविवारी तालुक्यासह चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज, धानोरा यासह अन्य तालुक्यातून भाजीपाल्याची आवक होते. तरीसुद्धा रविवारी भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून आले. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड केली आहे. अनेक बाजारपेठांमध्ये शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी नेतात. सध्या लग्न समारंभाची धामधूम आहे. भाजीपाल्याची आवक बाजारात बºयापैकी होत असली तरी मागणी अधिक असल्याने बाजारपेठेत वस्तू टिकून राहत नाही. त्यामुळे रविवारच्या बाजारात विविध वस्तूंचे दर वाढल्याचे दिसून आले. अनेक ग्राहकांनी किलो ऐवजी अर्धा किलो वस्तूवरच समाधान मानले.मेथी, पालक, चवळीमाट व इतर प्रकारच्या भाज्या या बाजारात अत्यल्प प्रमाणात विक्रीसाठी आल्या होत्या. त्यामुळे या पालेभाज्यांचेही दर विक्रेत्यांनी वाढविल्याचे दिसून आले. भाजीपाल्यापेक्षा ग्राहकांचा आंबे खरेदीवर अधिक भर होता.असे होते गडचिरोलीच्या बाजारात भाजीपाल्याचे दरआठवडाभरापूर्वी पालेभाज्या व फळभाज्यांचे दर स्थिर होते. परंतु १२ मे रोजी गडचिरोलीच्या आठवडी बाजारात विविध वस्तूंची दरवाढ झाल्याचे दिसून आले. उत्तम दर्जाचे टमाटर ३० रूपये प्रति किलो, बटाटे २० रूपये प्रति किलो, मिरची २० रूपये पाव, कांदे २० रूपये प्रति किलो, कोथिंबीर ३० ते ४० रूपये पाव, कारले १५ ते २० रूपये पाव, भेंडी २० रूपये प्रति किलो, लवकी २० रूपये प्रति नग, फुल कोबी १० रूपये पाव, फणस १० रूपये पाव, लसून ३० ते ४० रूपये पाव याप्रमाणे विकले जात होते. याशिवाय बाजारात आंब्याची अत्यल्प आवक असल्याने ७० ते १०० रूपये प्रति किलो दराने विक्री केली जात होती. या भाववाढीचा आर्थिक फटका ग्राहकांना बसला. सध्या लग्नसमारंभाचे दिवस असल्याने तसेच जिल्ह्यात वादळी पाऊस होत असल्याने भाजीपाल्याच्या आवकीवर परिणाम होत आहे. याचेच कारण म्हणून प्रचंड भाववाढ झाली. त्यामुळे खरेदी-विक्रीवरही परिणाम झाला.

टॅग्स :vegetableभाज्या