शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

वसंतराव मेश्राम यांना जिल्हा गौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 06:00 IST

गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने दिला जाणारा सन २०१९-२० या वर्षाचा जिल्हा गौरव पुरस्कार कुरखेडा तालुक्यातील वाकडीतील ज्येष्ठ सहकार व सामाजिक कार्यकर्ते वसंतराव मेश्राम यांना गुरूवारी (दि.२६) आरमोरी येथे देण्यात आला. ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते रोख ५१ हजार रु पये, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हा बँकेचा उपक्र म : १३ सहकारी सेवा संस्थांचे अध्यक्ष सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने दिला जाणारा सन २०१९-२० या वर्षाचा जिल्हा गौरव पुरस्कार कुरखेडा तालुक्यातील वाकडीतील ज्येष्ठ सहकार व सामाजिक कार्यकर्ते वसंतराव मेश्राम यांना गुरूवारी (दि.२६) आरमोरी येथे देण्यात आला. ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते रोख ५१ हजार रु पये, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी आमदार कृष्णा गजबे, तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून अरविंद पोरेड्डीवार, प्रमुख अतिथी म्हणून गडचिरो नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, संचालक खेमनाथ पाटील डोंगरवार, डॉ.दुर्वेश भोयर, आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, आरोग्य सभापती भारत बावनथडे, पाणीपुरवठा सभापती विलास पारधी, कुरखेडा नगर परिषदेचे अध्यक्ष रवींद्र गोटेफोडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, लोकांमध्ये राहणारा माणूस एकटा राहू शकत नाही. माणूस जन्माला आल्यानंतर त्याची एन्ट्री रडत होते. मात्र त्याचा शेवटही रडत होतो. माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला, त्याच्या जगण्याची उपलब्धी समाजास किती हे जास्त महत्वाचे. वसंतराव यांचे सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य लाखमोलाचे असल्याचे ते म्हणाले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून आरमोरी तालुक्यातील यशवंत देशमुख वडधा, शंकर जवादे बोडदा, मुखरू हूलके देलवडा, पांडुरंग दोनाडकर शिवनी, गुरूदेव राऊत सायगाव, बारीकराव पदा देलनवाडी, अरूण दुमाने शिरसी, दीपक निंबेकर आरमोरी, हिरालाल कानतोडे कासवी, महेंद्र तावडे वैरागड, रामभाऊ नरूले आकापूर, उमाजी भुसारी नरोटी, रामकृष्ण तामशेट्टीवार रवी आदी १३ सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.पी.आयलवार, संचालन प्रा.नरेंद्र आरेकर, तर आभार बँकेचे व्यवस्थापक अरूण निंबेकर यांनी मानले.

माणसातील माणुसकी जागविलीसत्कारमूर्ती वसंतराव मेश्राम यांनी सन १९७५ मध्ये सहकार क्षेत्रात प्रवेश करून विविध कार्यकारी संस्थेत तब्बल २० वर्षेपर्यंत सेवा दिली. १० वर्ष ते जिल्हा सहकारी बँकेचे संचालक होते. कृषी व ग्रामीण बँकेतही ११ वर्षे संचालक होते .सन २००५ पासून जिल्हा सहकारी बोर्डचे अध्यक्ष होते. खरेदी विक्र ी आणि भात गिरणीतही ते तीन वर्षापासून संचालक आहेत. तसेच प्रज्ञा करु णा शील संस्थेचे सचिव आणि तळेगाव गटग्रामपंचायतचे १० वर्षापर्यंत उपसरपंच होते. राजकारण, समाजकारण व सहकार क्षेत्रातील प्रामाणिक कार्यामुळे त्यांना जिल्हा बँकेने जिल्हा गौरव पुरस्कार देऊन गौरविले.यावेळी मनोगत व्यक्त करताना वसंतराव म्हणाले, मी सहकार क्षेत्रात अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या नेतृत्वात प्रवेश केला. तळागाळातील कार्यकर्त्यांचा स्नेह, प्रेम, जिव्हाळा दिला. माणसातील माणुसकी त्यांनी जागविली. अरविंद सावरकरांसारखा गुरु व मित्र लाभावे हे माझे भाग्य आहे. माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला सहकार क्षेत्रात आणून अनेक पदे दिली हे मी माझे भाग्य समजतो. हा गौरव माझ्यासाठी लाखमोलाचा ठेवा असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :bankबँक