चिरचाडी व वैरागड येथे कार्यक्रम : प्रवचन, जनजागृती फेरी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची काढली पालखीकुरखेडा/वैरागड : कुरखेडा तालुक्यातील श्री गुरूदेव बहुउद्देशीय भजन मंडळ चिरचाडीच्या वतीने गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळा शनिवारी घेण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रम साजरे करून गावातून फेरी काढून जनजागृती करण्यात आली. सकाळी ८ वाजता गावातून दिंडीच्या गजरात प्रस्थानफेरी उत्साहात काढण्यात आली. यावेळी गावातील बहुसंख्य गुरूदेव भक्त सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान प्रवचन व जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला श्री बहुउद्देशीय गुरूदेव भजन मंडळाचे अध्यक्ष शामराव करपेत, ऋषी गावराने, सरपंच पुरूषोत्तम गेडाम, डोमनदास गावराने, रामचंद्र कोडाप, पोलीस पाटील तुकडोजी डोंगरवार, सदस्य बळीराम मानकर, मधुकर गावराने, भारत भौरासे, पंढरी मांडवे, गुरूदत्त कोवे, हरिराम मानकर, लखन करपेत, अमोल कोसरे, शंकर राऊत, इंदू गायकवाड, धनूबाई डोंगरवार, धनवंताबाई करपेत उपस्थित होते.आरमोरी तालुक्यातील कुरखेडा येथे श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी गावातील मुख्य रस्त्याने राष्ट्रसंतांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. दिवसभर भजन व त्यानंतर गोपालकाला, सायंकाळी सामूदायिक प्रार्थना, प्रबोधन व रात्री गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने भोजनदान कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी महादेव दुमाने, मोरेश्वर पगाडे, मुखरू खोब्रागडे, आर. बी. तावेडे, सत्यदास आत्राम, सुरेश लांजीकार, प्रकाश आकरे, रमेश पगाडे, सलिम माखानी, बालाजी मुंगीकोल्हे, गोपाल दुमाने, गजानन हर्षे यांनी सहकार्य केले. सामूदायिक प्रार्थनेनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांवर समाज प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला श्रावण नागोसे, तलाठी कुबडे, डी. के. उघाडे, प्रा. प्रदीप बोडणे उपस्थित होते. समाज प्रबोधन कार्यक्रमातून गावकरी व गुरूदेव भक्तांना गाव विकासाचा मूलमंत्र देण्यात आला. यावेळी बहुसंख्य गुरूदेवभक्त हजर होते. (प्रतिनिधी)
विविध कार्यक्रमांनी राष्ट्रसंतांना आदरांजली
By admin | Updated: November 2, 2015 01:16 IST