शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वैरागडात रानडुकरांचा हैदोस वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 23:58 IST

धानपीक परिपक्व होण्याच्या स्थितीत असताना वैरागड परिसरातील शेतांमध्ये रानडुकरांचा हैदोस वाढला आहे. रानडुकरांकडून धान तसेच तूर पिकाचे नुकसान केले जात असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

ठळक मुद्देनिसवलेल्या धानाचे नुकसान : बंदोबस्त करण्याकडे वन विभागाचे होत आहे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : धानपीक परिपक्व होण्याच्या स्थितीत असताना वैरागड परिसरातील शेतांमध्ये रानडुकरांचा हैदोस वाढला आहे. रानडुकरांकडून धान तसेच तूर पिकाचे नुकसान केले जात असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.वैरागड गावालगत असलेला किल्ला झाडाझुडूपांनी वेढला आहे. या झाडाझुडूपांमध्ये दिवसभर रानडुकरांचे वास्तव्य राहते. रात्रीच्या सुमारास किल्ल्यालगत असलेल्या शेतांमध्ये शिरून धानपिकाचे प्रचंड नुकसान केले जात आहे. सध्या धानपीक निसवण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत रानडुकरांचा कळप धानाच्या शेतीत शिरून शेतीचे प्रचंड नुकसान करीत आहे. हातात आले पीक रानडुकरांकडून नष्ट होताना पाहून शेतकºयांचे डोळे पाणावत आहेत. रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे. मात्र वन विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. धानपीकाबरोबरच पारीवर असलेल्या तूर पिकाचेही नुकसान केले जात आहे. वन्यजीवांचे संरक्षण करण्याचे आवाहन वन विभागाच्या मार्फत केले जाते. मात्र हेच वन्यजीव आता शेतकºयांच्या जीवावर उठत आहेत. वन्यजीवांना ठार मारल्यास शिक्षा होत असल्याने शेतकरी रानडुकरांचा मारू सुध्दा शकत नाही. दुसरीकडे हेच रानडुकर शेतकºयांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे नेमके काय करावे, असा मोठा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.रबी पिकांच्या पेरणीला सुरूवात झाली आहे. रबी पिकांचेही मोठे नुकसान रानडुकरांकडून केले जाते. अगदी पेरणीपासून तर पीक काढेपर्यंत शेतात जागल करावी लागत असल्याने अनेक शेतकरी रबी पिकाचे उत्पादन घेण्यास धजावत नाही. त्यामुळे एकाच फसलवर समाधान मानावे लागते. वन विभागाने डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांकडून होत असली तरी वन विभागाची याकडे दुर्लक्ष होत आहे.मदतीसाठी अतिशय जाचक अटीवन्यजीवांकडून शेतीचे किंवा मालमत्तेचे नुकसान होत असल्यास वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संबंधित शेतकºयांना आर्थिक मदत वन विभागाच्या मार्फत देण्याची तरतूद आहे. शेतीचे नुकसान झाल्यानंतर संबंधित शेतकरी वन विभागाकडे अर्ज करतात. वन विभागाच्या अधिकाºयांनी पंचनामा केल्यानंतर आर्थिक मदत निश्चित केली जाते. मात्र जेवढे नुकसान झाले, त्याच्या अर्धीही मदत दिली जात नाही. त्याचबरोबर पंचनाम्यापासून ते मदत मिळेपर्यंत बरीच प्रक्रिया करावी लागते. यामध्ये शेतकºयांचा बराच वेळ व पैसा खर्च होतो. परिणामी अनेक शेतकरी पिकाचे नुकसान होऊनही तक्रार करीत नाही. महिनाभरात आर्थिक नुकसानीची भरपाई मिळावी, असे शासनाचे निर्देश असले तरी वनरक्षक, क्षेत्र सहायक सदर प्रकरणे वर्षभराचा कालावधी उलटूनही निकाली काढत नाही.दिवसेंदिवस रानडुकरांची संख्या वाढत चालली आहे. रात्रीच्या सुमारास अनेक कळप बाहेर पडत असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.