स्त्री जन्माची कहाणी : ‘लोकमत’ सखी मंचचा उपक्रमवैरागड : येथील लोकमत सखी मंचच्या सदस्यांनी कथा जानकीची हा नाट्यप्रयोग शुक्रवारी सादर केला. हा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सामाजिक दायित्वाची भूमिका स्वीकारलेल्या लोकमत सखी मंचच्या व्यासपीठावरून व्यक्तिमत्त्व विकासाचे आणि समाज प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम घेतल्या जातात. त्यामुळे महिलांना स्वतंत्र व्यासपीठ प्राप्त झाले आहे. वैरागड येथील सखी मंच सदस्यांनी कथा जानकीची या नाटकाचे दोन नाट्यप्रयोग सादर केले. सखी मंच सदस्या प्रा. वर्षा चौधरी, प्रतीभा बनकर, अस्मिता लोखंडे, सोना हडप, वसुधा तावेडे, विद्या खडसे यांनी नाटकामध्ये काम केले. प्रा. तुकाराम पाटील लिखित कथा जानकीची या नाटकात अत्याचाराच्या विरोधात लढणाऱ्या एका स्त्रीच्या जीवनाची कहाणी सांगण्यात आली आहे. अनेक अत्याचार व संकटांचा सामना केल्याचेही नाटकात दाखविण्यात आले आहे. स्त्री म्हणून तिच्या जीवनात मुलगी, पत्नी व माता या जबाबदाऱ्या ती कशी यशस्वीपणे पार पाडते. याचे चित्र रंगविण्यात आले आहे. सखी मंच सदस्यांनी अत्यंत चांगले नाटक सादर केले. त्यामुळे त्या पे्रक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरल्या. नाटकाला परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. संगीता पेंदाम यांनी गणेश स्तवन सादर केले. नाटक यशस्वी करण्यासाठी संयोजिका ज्योत्स्रा बोडणे, आशा भारती, रेखा आकरे, अनिता बनकर, संगीता मेश्राम, अंजली कोसे, संध्या उघाडे, दीक्षा फुलबांधे, नूतन लाऊतकर, अल्का भोयर, विजया तागडे, योगिता नव्हाते, लीना चौधरी, प्राणहीता लाऊतकर, कीर्ती लांजीकर, सरीता कावेळ, निकिता आंबेरकर, रूक्मिणी गिरीपुंजे, सरीता हर्षे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
वैरागडात ‘कथा जानकीची’
By admin | Updated: October 12, 2014 23:33 IST